फोटो सौजन्य - सोशल मीडिया
स्त्री २ ओटीटीवर येणार : स्त्री २ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला, या सिनेमाने रेकॉर्ड ब्रेक कमाई चित्रपट गृहांमध्ये केली आहे. या सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत असलेले राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांची प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले. या सिनेमाने ५०० करोडहुन अधिक कमाई केली आहे. त्याचबरोबर अनेक पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी आणि अपारशक्ती खुराणा यांनी सुद्धा चित्रपटामध्ये कमालीची कामगिरी केली आहे. हा चित्रपट इतका आवडला की तो दीड महिना चित्रपटगृहात राहिला. हॉरर-कॉमेडी चित्रपटांना हल्ली खूप पसंती दिली जात आहे कमालीची अभिनयामुळे सुद्धा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाई केली आहे. हा एक असा प्रकार बनला आहे ज्याचे चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर लोकप्रिय होत आहेत.
चित्रपट गृहांमध्ये खळबळ माजवल्यानंतर, आता स्त्री २ आता ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.दीड महिन्यानंतर ओटीटीवर चित्रपट प्रदर्शित होण्याची चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती. आता ही प्रतीक्षा संपली आहे, Amazon Prime ने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. स्त्री २ सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर त्याची अधिकृत माहिती आली आहे. Amazon Prime वर रिलीज झाला आहे. तुम्ही चित्रपट विनामूल्य पाहू शकता. आता हा चित्रपट भाड्यावर नाही. Amazon Prime ने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून Stree 2 च्या ओटीटी रिलीझबद्दल माहिती दिली आहे. पोस्ट शेअर करताना त्याने लिहिले – स्त्री आली आहे. प्राइम वर स्त्री. त्याचा व्हिडिओ खूपच मजेदार आहे. प्रत्येकजण ओरडताना दिसत आहे.
Stree AAAAAAAA chuki hai 🔊#StreeOnPrime, screaming now: https://t.co/B8VNJmVQ7O pic.twitter.com/FVQv1nC3st
— prime video IN (@PrimeVideoIN) October 9, 2024
स्त्री २ हा सिनेमा १५ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने पहिल्याच दिवशी पठाण सिनेमाचा रेकॉर्ड मोडला. त्याचबरोबर चित्रपटाने अक्षय कुमारचा खेल खेल में आणि जॉन अब्राहमचा वेदा हे चित्रपट प्रदर्शित झाले होते. दोन्ही मोठ्या स्टार चित्रपटांना स्त्री 2 ने मागे सोडले. पहिल्याच दिवशी कलेक्शनच्या बाबतीत हे चित्रपट स्त्री 2 पासून खूप दूर होते. तेव्हापासून, चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेले सर्व चित्रपट स्त्री 2 ला मागे टाकू शकले नाहीत.