(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला “राजवीर” हा आगामी हिंदी चित्रपट चर्चेत आहे. हा चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या माध्यमातून मिळणार आहे. अभिनेत्याचा हा पहिलाच चित्रपट असल्यामुळे तो या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. तसेच हा चित्रपट प्रेक्षकांना किती आवडतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेल्या शहनाज गिलची करण वीरने घेतली भेट, व्हिडिओ शेअर करत केली प्रार्थना
अर्थ स्टुडिओ यांनी सारा मोशन पिक्चर्स आणि रुचिका तोलानी प्रॉडक्शन्स, समृद्धी मोशन पिक्चर्स यांच्या सहकार्याने “राजवीर” चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. साकार प्रकाश राऊत, ध्वनि साकार राऊत, गौरव परदासनी, सूर्यकांत बाजी चित्रपटाचे निर्माते, तर रुचिका तोलानी सूचक सहनिर्मात्या आहेत. साकार राऊत, स्वप्नील देशमुख यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवादलेखन साकार राऊत, जेकॉब आणि पॉल कुरियन, माज खान यांनी केले आहे. भूषण वेदपाठक यांनी छायांकन, अभिनंदन गायकवाड, होपून सैकिया यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात सुहास खामकरसह झाकीर हुसैन, गौरव परदासनी, प्राशी अवस्थी, धीरज सानप यांच्या प्रमुख भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
“राजवीर” या चित्रपटात एका आयपीएस अधिकाऱ्याची गोष्ट दाखवण्यात आली आहे. अत्यंत तडफदार व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहासनं राजवीर ही भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सुहास खामकर अर्थातच “राजवीर”चा दमदार अभिनय दिसतो आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि सुहास खामकरचं तडफदार व्यक्तिमत्त्व पाहूनच चित्रपटाविषयी आता चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे.
Shanawas Death: प्रसिद्ध मल्याळम अभिनेते शानवास यांचे निधन; वयाच्या ७१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
या चित्रपटामध्ये ड्र्ग्जच्या ओव्हरडोसमुळे एकचा मृत्यू झाला असल्यानं राजवीर हा आयपीएस अधिकारी ड्रग्जचं रॅकेट उद्ध्वस्त करण्याचा निश्चय करतो. त्याच्या या ध्येयामध्ये अनेक अडथळे, आव्हाने, संकटे येतात. या संकटांना तोंड देत तो त्याचं ध्येय साध्य करतो का, या आशयसूत्रावर राजवीर हा चित्रपट बेतला आहे. अत्यंत तडफदार व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरनं राजवीर ही आयपीएस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. बॉडीबिल्डर असलेला सुहास खामकर या चित्रपटात धडाकेबाज ॲक्शन सिक्वेन्स करताना दिसणार आहे.