IMDb यांनी चित्रात, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज 2024 च्या सर्वांत लोकप्रिय आणि उरलेल्या वर्षातील सर्वांत बहुप्रतिक्षीत भारतीय चित्रपटांच्या नावांची घोषणा केली आहे. काय शोधावे व काय बघावे, यासाठी तुम्हाला IMDb वर येणार्या जगभरातील आणि दर महिन्यामधील 25 कोटींहून अधिक विझिटर्सच्या वास्तविक पेज व्ह्यूजवर या याद्या तुम्हाला उपलब्ध होऊन जातील.
वर्षातील आत्तापर्यंत क्र. 1 वर असलेल्या कल्की 2898- एडी याचित्रपटाचा प्रेक्षकांमध्ये गरज वाढला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक नाग अश्विन याबद्दल म्हणाले की, “IMDb यादीमध्ये येणे हा आमच्या संपूर्ण टीमसाठी मोठ्या आनंदाची व गौरवाची बाब आहे. मला वाटते की, जगभरातील प्रेक्षकांचे प्रेम याद्वारे आम्हाला मिळत आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या मर्यादांच्या पुढे जाण्याची प्रेरणा मिळत आहे.” असे त्यांनी सांगितले आहे.
2024 मधील आत्तापर्यंत क्र. 2 वरील भारतीय चित्रपट असलेल्या मंजुमेल बॉयज ठरला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक चिदंबरम हे याबद्दल बोलताना म्हणाले की, “मंजुमेल बॉयज ही मैत्रीची व सर्व्हायव्हलची रोमांचक गाथा आहे आणि विपरित परिस्थितीमध्ये विजय मिळवण्याची जागतिक थीम यावर आधारित हा चित्रपट आहे. चित्रपटाची व्हिज्युअल प्रकारे सादर केलेली कहाणी भाषांच्या सीमांच्या पलीकडे जाते व कहाणी जगभरातील प्रेक्षकांपुढे उलगडते. हा चित्रपट माझ्या हृदयाशी अतिशय जवळचा आहे आणि श्रोत्यांचा त्याला मिळणारा प्रतिसाद आणि प्रेम मला खरोखर नतमस्तक करते. या बहुमानासाठी मी IMDb ला धन्यवाद देतो व इतके प्रेम आणि आपुलकी दिल्याबद्दल जगभरातील दर्शकांबद्दल मन:पूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. या चित्रपटातील जादू जीवंत करणार्या संपूर्ण कलाकार व सहकार्यांचे परिश्रम व मेहनतीचा हा पुरावा आहे.” असे त्यांनी या चित्रपटाबद्दल आणि या यादीत २ स्थानावर असल्याबद्दल त्यांचे मत व्यक्त केले.
IMDb च्या माहितीनुसार, “भारतातील व जगभरातील दर्शकांना नावीन्यपूर्ण आणि परिणाम घडवून आणणार्या चित्रपटांची भुरळ पडत आहे. 2024 मधील (आत्तापर्यंतचे) सर्वांत प्रसिद्ध भारतीय चित्रपटांच्या यादीमध्ये वैविध्यपूर्ण गोष्टी आहेत ज्यामध्ये या पाच चित्रपटांचा समावेश होतो. तीन मल्याळम व दोन तेलुगू चित्रपटांचा यामध्ये सहभाग आहे. भाषा कोणतीही असली तरी थरारक कथेकडे प्रेक्षक आकर्षित होत असल्याचा हा पुरावा आहे,” असे IMDb इंडियाच्या प्रमुख यामिनी पतोडिया यांनी सांगितले आहे.” तसेच, पुढे जाणार्या भागांची मोठी मागणी दाखवणार्या सर्वांत बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी पाच हे प्रसिद्ध फ्रँचायजीचे सीक्वेल्स किंवा भाग आहेत ज्यामध्ये पुष्पा: द रूल – पार्ट 2 (क्र. 1), वेलकम टू द जंगल (क्र. 3), सिंघम अगेन (क्र. 6), भूल भुलैया 3 (क्र. 7), आणि स्त्री 2 (क्र. 10) हे आहेत.” असे त्या म्हणाल्या.
भारतामध्ये 1 जानेवारी 2024 ते 10 जुलै 2024 पर्यंत रिलीज झालेल्या सर्व चित्रपटांमधील हे असे चित्रपट आहेत ज्यांना किमान 10,000 व्होटस मिळाले आहेत आणि तसेच या चित्रपटांना IMDb युजर रेटींग 6 किंवा त्याहून अधिक मिळत आहेत. आणि हे चित्रपट IMDb ग्राहकांसाठी सातत्याने लोकप्रिय होती व जगभरात IMDb वर असलेल्या 25 कोटी मासिक व्हिजिटर्सच्या वास्तविक पेज व्ह्यूजनुसार हे चित्रपट प्रसिद्ध ठरले आहेत.
उल्लेखनीय आहे की, दीपिका पदुकोन, दिशा पटानी आणि अजय देवगण हे या दोन्ही याद्यांशी संबंधित आहेत. पदुकोन आणि पटानी कल्की 2898- एडी मध्ये आहेत तर दीपिका फायटरमध्येसुद्धा आहे. देवगन शैतानमध्ये आहे. दीपिका आणि देवगन पहिल्यांदाच या वर्षी रिलीज होणार्या सिंघम अगेनमध्ये एकत्र काम करताना दिसणार आहेत. पटानीच्या येणार्या रिलीजेसमध्ये वेलकम टू द जंगल आणि कंगुवा हे दोन चित्रपटांचा समावेश आहेत.
IMDb ग्राहक या लक्षावधी चित्रपट आणि सिरीज पाहण्यासाठी IMDb सह जोडू शकतात. तुम्हाला जे बघायचे आहे ते यावर ट्रॅक करून IMDb वॉचलिस्टच्या फीचरमुळे तुम्हाला जे चित्रपट, सिरीज आणि रेटिंग तुम्ही इथे पाहू शकता. ग्राहक त्यांच्या वॉचलिस्टला IMDb रेटिंग, प्रसिद्धी व इतर प्रकारे सॉर्टही करू शकतात.