Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तमन्ना भाटिया साकारणार ‘व्ही. शांताराम’ यांच्या पत्नीची भूमिका; चित्रपटाच्या भव्य पोस्टरने वेधले लक्ष

भारतीय चित्रपटसृष्टीचे जननायक 'व्ही. शांताराम’ यांच्यावर आधारित बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हिंदी अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ज्याचे आणखी एक पोस्टर रिलीज झाले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 09, 2025 | 12:17 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • तमन्ना भाटिया साकारणार ‘व्ही. शांताराम’ यांच्या पत्नीची भूमिका
  • चित्रपटाच्या भव्य पोस्टरने वेधले लक्ष
  • ‘व्ही. शांताराम’ यांच्यावर आधारित चित्रपटाची कथा
 

भारतीय सिनेमातील महान दिग्दर्शक आणि निर्माता शांताराम राजाराम वणकुद्रे (व्ही. शांताराम) यांच्या जीवनावर आधारित ‘व्ही. शांताराम’ या भव्य चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर आता ‘जयश्री’ या अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तिरेखेची पहिली झलक सादर करण्यात आली आहे. ही भूमिका अभिनेत्री तमन्ना भाटिया साकारत असून, व्ही. शांताराम यांची सहकलाकार ते सहचारिणी असा नाजूक आणि भावस्पर्शी प्रवास या व्यक्तिरेखेतून उलगडणार आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये तमन्ना भाटिया गुलाबी साडीत मोहक अंदाजात दिसत आहे. तिच्या व्यक्तिमत्त्वातील सोज्वळता, नजाकत आणि कलात्मकतेची नाजूकता पोस्टरमध्ये दिसून येत आहे. या झलकेतून चित्रपटाची भव्य रचना, वैभवशाली मांडणी आणि त्या काळाचा समृद्ध कॅन्व्हास स्पष्टपणे दिसून येत आहे.

धरमजींच्या जाण्याने देओल कुटुंबातील वाद चव्हाट्यावर! हेमामालिनी यांचा मोठा निर्णय, वेगळ्या प्रार्थना सभेचे केले आयोजन

चित्रपटात ‘जयश्री’ हे पात्र केवळ व्ही. शांताराम यांच्या पत्नीचे नसून, ते त्यांच्या आयुष्यातील पहिली प्रेरणा, कलात्मक सहप्रवासी आणि भावनिक आधारस्तंभ म्हणून साकारली जाणार आहे. सहकलाकार म्हणून सुरुवात होऊन विवाहापर्यंतचा प्रवास, प्रेम, तणाव, संवेदनशीलता आणि त्या काळातील सिनेमासृष्टीचे पडद्यामागचे वास्तव या चित्रपटातून उलगडले जाणार आहे.

निर्मात्यांच्या मते, “जयश्री ही व्यक्तिरेखा भावनांनी आणि कलात्मकतेने ओतप्रोत भरलेली आहे. तमन्ना भाटियाच्या व्यक्तिमत्त्वातील सौंदर्यपूर्ण शालीनता, नैसर्गिक चमक आणि तिच्या डोळ्यांतील भावना या भूमिकेला जिवंत करतात. ती एक उत्कृष्ट अभिनेत्री असून, या भूमिकेत ती जणू त्या काळातून थेट आजच्या पडद्यावर आली आहे असे वाटते.”

 

रस्ते अपघाताचा बळी ठरला ‘बिग बॉस’ फेम झीशान खान; गाडीची झाली वाईट अवस्था, थोडक्यात बचावला जीव

याआधी प्रदर्शित झालेल्या सिद्धांत चतुर्वेदीच्या ‘व्ही. शांताराम’ यांच्या पोस्टरने प्रेक्षकांमध्ये अपार उत्सुकता निर्माण केली होती. आता तमन्ना भाटियाच्या ‘जयश्री’ यांच्या पोस्टरमुळे त्या कथेतला भावनिक आणि कलात्मक थर अधिक गडद झाला आहे. पडद्यावर व्ही. शांताराम आणि जयश्री यांचे समीकरण, त्यांचा सहप्रवास आणि त्यांच्या नात्यातील गुंफण पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये अधिक वाढली आहे. हा चित्रपट राजकमल एंटरटेनमेंट, कॅमेरा टेक फिल्म्स आणि रोअरिंग रिव्हर प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित असून राहुल किरण शांताराम, सुभाष काळे आणि सरिता अश्विन वर्दे हे निर्माते आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत देशपांडे यांनी केले आहे.

हा चित्रपट व्ही. शांताराम यांच्या जीवनावर आणि अविश्वसनीय कार्यावर आधारित असेल. तमन्ना भाटिया आणि फरदीन खान सारखे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार असल्याची शक्यता आहे. ‘व्ही. शांताराम’ हा चित्रपट येत्या नवीन वर्षात प्रदर्शित होणार असून, तो भारतीय सिनेमाच्या सुवर्णकाळाला नव्या पिढीसमोर आणणारा एक भव्य आणि भावस्पर्शी सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे.

Web Title: Tamannaah bhatia as jayashree first look unveiled in siddhant chaturvedi s v shantaram biopic

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 12:17 PM

Topics:  

  • Bollywood
  • siddhant chaturvedi
  • Tamannaah Bhatia

संबंधित बातम्या

‘अचानक कोसळला अन्…’ लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान Mohit Chauhan चा व्हिडीओ चर्चेत; गायकाचे चाहते चिंतेत
1

‘अचानक कोसळला अन्…’ लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान Mohit Chauhan चा व्हिडीओ चर्चेत; गायकाचे चाहते चिंतेत

सुरुवातीला Downfall आता जबरदस्त Comeback! ‘धुरंधर’ अभिनेता अक्षय खन्नाची संपत्ती पाहून चमकतील डोळे
2

सुरुवातीला Downfall आता जबरदस्त Comeback! ‘धुरंधर’ अभिनेता अक्षय खन्नाची संपत्ती पाहून चमकतील डोळे

इस्कॉन मंदिरात ‘ही- मॅन’ ला वाहिली श्रद्धांजली; ९० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला संगीत कार्यक्रम
3

इस्कॉन मंदिरात ‘ही- मॅन’ ला वाहिली श्रद्धांजली; ९० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला संगीत कार्यक्रम

‘सिकंदर’ला भारी पडला ‘धुरंधर’! रणवीरपेक्षाही अक्षय खन्नाने वेधले लक्ष; प्रेक्षकांनी केले तोंडभरून कौतुक
4

‘सिकंदर’ला भारी पडला ‘धुरंधर’! रणवीरपेक्षाही अक्षय खन्नाने वेधले लक्ष; प्रेक्षकांनी केले तोंडभरून कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.