(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
तमिळ अभिनेता विशालने अभिनेत्री सई धनशिकासोबत साखरपुडा केला असल्याचे समोर आले आहे. विशालने स्वतः सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती शेअर केली आहे. यामध्ये त्याने त्याच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. विशाल आणि धनशिका दोघेही फोटोमध्ये आनंदी दिसत आहे. चाहते त्यांचे अभिनंदन करत आहेत. तसेच त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत.
अभिनेत्याने साखरपुड्याचे शेअर केले फोटो
अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर साखरपुड्याचे फोटो शेअर करताना अभिनेता विशालने लिहिले की, ‘माझ्या खास वाढदिवसानिमित्त शुभेच्छा आणि आशीर्वाद दिल्याबद्दल जगातील कानाकोपऱ्यातील सर्व प्रियजनांचे आभार. आज मला सई धनशिकासोबतच्या माझ्या साखरपुड्याची आनंदाची बातमी माझ्या कुटुंबासोबत शेअर करताना आनंद होत आहे. मी खूप आनंदी आहे. नेहमीप्रमाणे, मी तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा मागत आहे.’ असे लिहून अभिनेत्याने दोघांचे सुंदर फोटो शेअर केले आहे.
विशाल आणि सई एकमेकांना १५ वर्षांपासून ओळखत आहेत
विशाल आणि सई धनशिका यांनी या वर्षी मे महिन्यात एका कार्यक्रमात त्यांच्या साखरपुड्याची घोषणा केली. साखरपुड्याचा दिवस देखील खास आहे कारण विशालचा वाढदिवसही याच दिवशी आहे. विशाल आणि सई धनशिका गेल्या १५ वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. दोघेही खूप चांगले मित्र आहेत. तसेच त्यांचा आता साखरपुडा झालेला पाहून त्यांचे चाहते त्यांचं कौतुक करत आहेत.
दोघांमध्ये १२ वर्षांचा वयाचा फरक
विशाल आणि सई धनशिका यांच्यातील वयाचा फरक त्यांच्या साखरपुड्याच्या चर्चेसोबतच चर्चेत आला. खरं तर, विशाल त्याच्या वाढदिवशी ४८ वर्षांचा झाला आहे. धनशिका सध्या ३५ वर्षांची आहे. २० नोव्हेंबर १९८९ रोजी जन्मलेली सई धनशिका नोव्हेंबरमध्ये ३६ वर्षांची होणार आहे. अशा परिस्थितीत, दोघांमध्ये १२ वर्षांपेक्षा जास्त अंतर आहे.
विशालने बाल कलाकार केली सुरुवात
विशाल हा दक्षिण चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. तो तमिळ चित्रपटसृष्टीत जास्त सक्रिय आहे. त्याचे पूर्ण नाव विशाल कृष्ण रेड्डी आहे, परंतु तो फक्त विशाल या नावाने ओळखला जातो. विशालने १९८९ मध्ये ‘जडिक्केथा मूडी’ या तमिळ चित्रपटात अभिनय करून बाल कलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्याच वेळी, २००४ मध्ये ‘चेल्लामाई’ या तमिळ चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून त्याने आपली ओळख निर्माण केली.
सईने वयाच्या १६ व्या वर्षी केली सुरुवात
सई धनशिका ही तेलुगू चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने वयाच्या १६ व्या वर्षी तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. रजनीकांतच्या ‘कबाली’ (२०१६) या चित्रपटात तिने अभिनय करून खूप लोकप्रियता मिळवली. या चित्रपटात ती रजनीकांतच्या मुलीच्या भूमिकेत दिसली.