Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याचे कर्करोगाने निधन, पत्नी आणि मुलींवर कोसळला दुःखाचा डोंगर!

दिग्गज टीव्ही अभिनेते युवनराज नेथरुन यांचे निधन झाले आहे. कॅन्सरमुळे या अभिनेत्याला आपला जीव गमवावा लागला असून, या बातमीने त्याच्या चाहत्यांना आणि कुटूंबियांना मोठा धक्का बसला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 04, 2024 | 11:28 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

तमिळ चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेता युवनराज नेथरुन यांचे निधन झाले. या अभिनेत्याला कर्करोगामुळे आपला जीव गमवावा लागला. गेल्या सहा महिन्यांपासून ते गंभीर आजाराने त्रस्त होते. त्याच्यावर उपचार सुरू होते. परंतु अचानक अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरणजाणून घेऊयात.

कॅन्सरमुळे युवनराज नेथरुण यांचे निधन झाले
लोकप्रिय टीव्ही अभिनेता युवनराज नेथरुण यांचे निधन झाले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते, तसेच अभिनेत्यावर उपचार देखील सुरु होते. असे असून सुद्धा ते आजाराशी लढू शकले नाहीत. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबात शोककळा तर पसरली आहेच पण टीव्ही इंडस्ट्रीतही निराशेचे वातावरण आहे. नेथरुन यांची पत्नी अभिनेत्री दीपिका मुरुगन आणि त्यांच्या दोन मुली अबेनाया आणि आंचना यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या अंत्यसंस्काराशी संबंधित माहिती अद्याप समोर आलेली नाही.

अनेक टीव्ही शोमध्ये काम केले
टीव्ही जगतात नेत्रुन म्हणून प्रसिद्ध असलेल्या युवनराजने अनेक प्रकारच्या पात्रांमध्ये अभिनय केला होता आणि तो त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जात होता. ‘मरुधानी’सारख्या टीव्ही मालिकेने त्यांनी खास ओळख निर्माण केली होती. सुरुवातीला अभिनेता प्रामुख्याने नकारात्मक भूमिकांमध्ये दिसला, परंतु या भूमिकांमध्येही त्यांच्या प्रतिभेचे कौतुक झाले.

 

रिॲलिटी शोचाही एक भाग होते
नेथरुन यांची कारकीर्द अनेक रिॲलिटी शोजशीही जोडली गेली, जिथे त्याने आपली खास ओळख निर्माण केली. अभिनेत्याने विजय टेलिव्हिजनच्या ‘जोडी नंबर 1’ सीझन 3 आणि 5 मध्ये भाग घेतला होता. याशिवाय त्यांनी सुहानी टीव्हीच्या ‘मस्ताना मस्ताना’ या डान्स रिॲलिटी शोमध्येही भाग घेतला होता, जिथे ते पहिले आले होते. तसेच त्यांनी ‘मी अँड मिसेस चिन्नाथिराय किल्लाडी’ आणि ‘सुपर कुडुंबम’ सारख्या इतर शोमध्येही आपली उपस्थिती दर्शवली.

नेथरुन यांची पत्नी दीपिका मुरुगन देखील लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. दोघांनी अनेक शोमध्ये एकत्र काम केले. सध्या दीपिका ZEE5 वर दाखवल्या जाणाऱ्या ‘निनाताले इनिक्कम’ या लोकप्रिय मालिकेत काम करत आहे.

साऊथच्या ‘पुष्पाराज’मध्ये मराठी भाषेचा लहेजा कसा? श्रेयस तळपदेने दिलं स्पष्टीकरण

नेत्रुनची मुलगी देखील अभिनेत्री आहे
नेथरुन यांची मुलगी अबेनाया हिनेही टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे, तर त्यांची दुसरी मुलगी आंचना हिला अलीकडेच एका तामिळ चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून साइन केले आहे. छोट्या पडद्यावरच नव्हे तर मोठ्या पडद्यावरही आपला ठसा उमटवण्यात हे कुटुंब यशस्वी ठरले आहे. नेथरुन यांचा शेवटचा टीव्ही प्रोजेक्ट ‘पोन्नी’ आणि ‘बाकियालक्ष्मी’ होता, जिथे त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या निधनाने टीव्ही इंडस्ट्रीचे मोठे नुकसान झाले आहे आणि त्यांचे चाहते आता त्यांच्या पात्रांद्वारे त्यांची आठवण ठेवतील. त्यांच्या निधनाने टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे.

 

Web Title: Tamil actor yuvanraj nethran died due to cancer fans are in shock

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2024 | 11:28 AM

Topics:  

  • tamil actor

संबंधित बातम्या

प्रसिद्ध कॉमेडियन अभिनेते Madhan Bob यांचे निधन, अभिनेता ‘या’ गंभीर आजाराने ग्रस्त
1

प्रसिद्ध कॉमेडियन अभिनेते Madhan Bob यांचे निधन, अभिनेता ‘या’ गंभीर आजाराने ग्रस्त

प्रसिद्ध तामिळ दिग्दर्शक Velu Prabhakaran यांचे निधन, वयाच्या ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2

प्रसिद्ध तामिळ दिग्दर्शक Velu Prabhakaran यांचे निधन, वयाच्या ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

निधनानंतर Saroja Devi यांची इच्छा झाली पूर्ण, पाच वर्षांपूर्वी ‘ही’ अनोखी इच्छा केली होती व्यक्त
3

निधनानंतर Saroja Devi यांची इच्छा झाली पूर्ण, पाच वर्षांपूर्वी ‘ही’ अनोखी इच्छा केली होती व्यक्त

प्रसिद्ध दिग्दर्शक Vikram Sugumaran यांचे धक्कादायक निधन, वयाच्या ४७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
4

प्रसिद्ध दिग्दर्शक Vikram Sugumaran यांचे धक्कादायक निधन, वयाच्या ४७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.