साऊथच्या 'पुष्पाराज'मध्ये मराठी भाषेचा लहेजा कसा? श्रेयस तळपदेने दिलं स्पष्टीकरण
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाच्या ‘पुष्पा : द राईज’ चित्रपटाने २०२१ मध्ये धमाकेदार कमाई करत सर्वांचेच लक्ष वेधले. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये इतकी क्रेज पाहायला मिळाली की, चित्रपटातली गाणी, अल्लू अर्जुनचे डायलॉग्स आणि त्याच्या जबरदस्त डान्सचे फक्त भारतातच नाही तर जगभरात फॅन्स तयार झाले. चित्रपटाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटाचा दुसरा भाग येत्या ५ डिसेंबरला येणार आहे. ‘पुष्पा २ : द रुल’ चित्रपटासाठी चाहते उत्सुक आहेत.
“चट मंगनी पट ब्याह…” प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने उरकलं गुपचूप लग्न, पाहा Photos
हा बहुप्रतिक्षित चित्रपट थिएटरमध्ये, तेलुगू, हिंदी, मल्याळम, तामिळ, कन्नड आणि बंगाली भाषेमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी आता अवघे काही तासच शिल्लक राहिले आहेत. प्रेक्षकांना चित्रपटाची कमालीची उत्सुकता असून चित्रपटाला आवाज देणाऱ्या अभिनेता श्रेयस तळपदेने चित्रपटाबद्दल एक महत्वाची माहिती दिली आहे. अभिनेता श्रेयस तळपदेने हिंदी व्हर्जनमधल्या पुष्पला आवाज दिला आहे. चित्रपटामध्ये अनेक मराठी शब्दही आहेत. आता हेच साऊथच्या ‘पुष्पाराज’मध्ये मराठी भाषेचा लहेजा कसा आला? या प्रश्नाचं उत्तर अभिनेत्याने दिले आहे.
TRP साठी मोठा मेकर्सचा मोठा डाव, Anurag Kashyap ची धमाकेदार एंट्री
लेहरेन रेट्रोला दिलेल्या जुन्या मुलाखतीत श्रेयसने सांगितले की, “मला नव्हतं वाटलं की, ‘पुष्पा : द राईज’ला इतके अभुतपूर्व यश मिळेल. पहिल्यांदा मला ह्या चित्रपटासाठी फोन आला होता. तेव्हा मला सांगितलं की, एक तेलुगू चित्रपट आहे, निर्माते त्या चित्रपटाला हिंदीतही प्रदर्शित करू इच्छित आहेत. जेव्हा मी चित्रपटाच्या डबिंगची फी सांगितली तेव्हा निर्माते मनीष साह मला म्हणाले की, “अरे, तू जितकी फी घेतोय तेवढे पैसे चित्रपटाने वसूल तर करायला हवे, तुला इतके पैसे नाही मिळणार.” निर्मात्यांशी बोलल्यानंतर श्रेयसने ‘पुष्पा’ चित्रपट पाहिला, तेव्हा त्याला तो चित्रपट फार आवडला.
सोनू सुद बाबा महाकालेश्वरच्या चरणी लीन, ‘या’ चित्रपटासाठी देवाकडे घातलं साकडं
मुलाखतीत श्रेयसने पुढे सांगितलं की, “मला हा चित्रपट पाहण्यासाठी निर्मात्यांनी हैदराबादला बोलावलं होतं, मात्र मला माझ्या दुसऱ्या चित्रपटामुळे जायला जमलं नाही. मी संपूर्ण चित्रपट दोन भागात पाहिला, त्यानंतर चित्रपटाचं डबिंग सुरू झाले. आम्हा सर्वांना चित्रपटाचं डबिंग करताना खूप मजा आली. हा चित्रपट इतका मजेशीर होता की मी मध्येच मराठी बोलत होतो. श्रेयस मराठी बोलत असल्याचे पाहून डबिंग दिग्दर्शकाने सांगितले की, आतापासून तो चित्रपटात मराठीचा वापर करणार आहे. तेव्हापासून ‘पुष्पा’च्या हिंदी व्हर्जनमध्ये मराठी टच पाहायला मिळत आहे.”