फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बिग बॉस 18 : टेलिव्हिजन वरचा वादग्रस्त रिऍलिटी शो बिग बॉस १८ सध्या प्रचंड चर्चेत आहे. बिग बॉसचा हा शो बऱ्याच वर्षांपासून सुरु आहे त्याला प्रेक्षकांनी भरपूर पसंती दाखवली आहे. यावेळी बिग बॉस १८ चा नवा सिझन आल्यापासून प्रेक्षक प्रचंड उत्सुक होते. या नव्या सीझनमध्ये अनेक नवे स्पर्धक आणि मोठे चेहरे बिग बॉसच्या घरामध्ये आले आहेत. यामध्ये करणवीर मेहरा, व्हिव्हियन डिसेना, शिल्पा शिरोडकर अशा अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. आता बिग बॉसच्या प्रत्येक सीझनमध्ये आठवड्यामध्ये कोणता स्पर्धक चांगली कामगिरी करत आहे आणि प्रेक्षकांच्या मते कोणते टॉप ५ खेळाडू आठवड्यामध्ये आहेत याचा अंदाज Ormax मीडिया लावत असते. यामध्ये अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. यामध्ये आता तिसऱ्या आठवड्याची रँकिंग Ormax मीडियाने शेअर केली आहे आणि त्यानंतर सोशल मीडियावर Ormax मीडियाला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.
हेदेखील वाचा – Bigg Boss 18 : घरातील या दोन स्पर्धकांवर सलमान संतापला! म्हणाला…तू समोर येऊन
Ormax मीडियाच्या सोशल मीडियावर त्यांनी या आठवड्याची रँकिंग सोशल मीडियावर शेअर केली आहे, आणि त्यांनी पहिल्या क्रमांकावर रजत दलालचे नाव आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर व्हिव्हियन डिसेना आहे. तिसऱ्या क्रमांकावर प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिरोडकर आहे. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर अनुक्रमे चाहत पांडे आणि श्रुतिका अर्जुन हे आहेत. त्यामुळे आता Ormax मीडियाला या रँकिंगवरून मोठ्या प्रमाणात प्रेक्षक संताप व्यक्त करत आहेत. व्हीव्हीएन डिसेना शोमध्ये काहीही करत नसताना प्रेक्षक तो वरच्या स्थानावर आहे हे प्रेक्षकांना अजिबात मान्य नाही असे नेटकऱ्यांचे आणि बिग बॉस चाहत्यांचे मत आहे. त्याचबरोबर शिल्पा शिरोडकर हे मोठे नाव आहे परंतु अभिनेत्रीने शोमध्ये फार काही खास केले नाही.
Ormax Characters India Loves: Top 5 most popular #BiggBoss18 contestants (Oct 19-25) #OrmaxCIL@rajat_9629, @VivianDsena01, @Shilpashirodkr, #ChaahatPandey, @Shrutika_arjun pic.twitter.com/m6knz0cMrt
— Ormax Media (@OrmaxMedia) October 26, 2024
चाहत्यांची मते आहेत की बिग बॉस १८ च्या सीझनमध्ये करणवीर मेहरा आणि अविनाश मिश्रा यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे सध्या Ormax मीडियाच्या रँकिंगमध्ये त्यांच्या नावाची चर्चा होणे गरजेचे आहे. बऱ्याच बिग बॉसला देखील प्रेक्षकांनी ट्रोल केले आहे कारण व्हिव्हियन डिसेना काहीही शोमध्ये करत नसताना त्याला विनाकारण कोपऱ्यांमध्ये बोलताना दाखवले जात आहे असे प्रेक्षकांची मते आहेत.
मागील तीन आठवड्यापासून शोमध्ये अविनाश मिश्रा आणि करणवीर मेहरा यांचे कडाक्याचे वाद पाहायला मिळत आहेत, त्यामुळे त्यांची चर्चा सोशल मीडियावर जास्त होत आहेत. तरीही ते Ormax मीडियाच्या यादीमध्ये नाहीत यासाठी प्रेक्षक दुखी झाले आहेत. त्याचबरोबर प्रेक्षक अविनाश मिश्रा आणि करणवीर मेहरा यांना टॉप ५ चे प्रबळ दावेदार मानत आहेत. त्याचबरोबर ते करत असलेल्या कामगिरीचे देखील मोठे कौतुक केले जात आहेत.