Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 20 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rhea Kapoor : रिया कपूरच्या टीमशी संबंधित कोट्यावधींच्या दागिन्यांची चोरी; मुंबई पोलिसांकडून तपास सुरू

रिया कपूरच्या टीमशी संबंधित तब्बल १.३५ कोटी रुपयांच्या हिऱ्याच्या कानातल्यांच्या चोरीप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. फॅशन कार्यक्रमासाठी भाडेतत्त्वावर घेतलेले दागिने घेऊन टीम दुबईमार्गे न्यूयॉर्कला गेली होती आणि जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरून ‘द पिएर’ हॉटेलमध्ये मुक्काम केला होता.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 20, 2026 | 07:12 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • या प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
  • केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांनी ‘द पिएर’ हॉटेलमध्ये मुक्काम केला.
  • गोयंका ज्वेलर्सचे सुमारे ६९ लाख रुपयांचे झांबियन एमराल्ड जडित गोल्ड बॉर्डर असलेले कानातले यांचा समावेश आहे.
चित्रपट निर्माती आणि उद्योजिका रिया कपूर हिच्या टीमशी संबंधित तब्बल १.३५ कोटी रुपयांच्या मौल्यवान हिऱ्याच्या कानातल्यांच्या चोरीची घटना समोर आली आहे. हे दागिने रियाची मेकअप आर्टिस्ट सवलीन सिंग यांच्या हँडबॅगमधून गायब झाल्याचा दावा करण्यात आला असून, या प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Tumbadchi Manjula : बॉक्स ऑफिसवर फक्त मंजुळाची हवा! 15 दिवसांची कमाई बघाच, सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर

मिळालेल्या माहितीनुसार, एका प्रतिष्ठित फॅशन कार्यक्रमासाठी हे कानातले मुंबईतील दोन नामांकित ज्वेलर्सकडून भाडेतत्त्वावर घेण्यात आले होते. रिया कपूरची टीम २७ एप्रिल रोजी मुंबईहून दुबईमार्गे न्यूयॉर्कला रवाना झाली होती. २८ एप्रिल रोजी जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांनी ‘द पिएर’ हॉटेलमध्ये मुक्काम केला.

हॉटेलमध्ये दागिन्यांचे बॉक्स उघडताना ते रिकामे असल्याचे सवलीन सिंग यांच्या लक्षात आले. पोलिसांच्या माहितीनुसार, चोरी झालेल्या दागिन्यांमध्ये मेहता ज्वेलर्सचे सुमारे ६६ लाख रुपयांचे पाचू जडित डायमंड-गोल्ड कानातले आणि गोयंका ज्वेलर्सचे सुमारे ६९ लाख रुपयांचे झांबियन एमराल्ड जडित गोल्ड बॉर्डर असलेले कानातले यांचा समावेश आहे.

मुंबईत परतल्यानंतर सवलीन सिंग यांनी सहार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Mardini Trailer Out : ‘ज्याला आई मारी त्याला कोण तारी!’ आईच्या संघर्षाची थरारक कथा; ‘या’ तारखेला येईल अनुभवता

दरम्यान, या घटनेबाबत रिया कपूर किंवा कपूर कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. ‘क्रू’, ‘वीरे दी वेडिंग’ आणि ‘खूबसुरत’ यांसारख्या चित्रपटांची निर्माती असलेल्या रिया कपूरच्या टीमशी संबंधित या चोरीच्या घटनेमुळे मनोरंजन विश्वात चर्चांना उधाण आले आहे.

Web Title: Theft of jewelry worth crores linked to the rhea kapoor team

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 07:12 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.