
फोटो सौजन्य - Social Media
Janhvi Kapoor : उन्हाळा आणि आंबा यांचं नातं अगदी खास मानलं जातं. आंब्याचा सुगंध, त्याची गोड चव आणि त्यावरचं लोकांचं प्रेम दरवर्षी नव्यानं पाहायला मिळतं. यंदाच्या मँगो सीझनमध्ये अभिनेत्री Janhvi Kapoor हिनेही तिचं आंब्यावरील प्रेम व्यक्त केलं असून ती सध्या Theobroma Patisserie सोबतच्या खास मोहिमेमुळे चर्चेत आली आहे. या मोहिमेत जान्हवीने आंब्याच्या डेझर्ट्सचा मनमुराद आनंद घेताना दिसत असून, “आंब्याचं प्रेम कधीच साधं नसतं,” असा मजेशीर संदेशही देण्यात आला आहे.
पहिल्या घासापासून शेवटच्या क्रीमच्या थरापर्यंत आंब्याची चव कशी मन जिंकते, हे या मोहिमेत खास पद्धतीने दाखवण्यात आलं आहे. जान्हवीच्या अंदाजातून आंबा प्रेमींच्या भावना अचूकपणे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. देशभरात आंबा सीझन सुरू होताच लोकांच्या छोट्या-छोट्या सवयी, आंब्यासाठीची क्रेझ आणि डेझर्ट्सबद्दलचं वेड पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
याच पार्श्वभूमीवर Theobroma Patisserie ने मर्यादित कालावधीसाठी खास Mango Specials सादर केले आहेत. आंब्यापासून प्रेरित विविध डेझर्ट्स या खास मेनूमध्ये समाविष्ट करण्यात आले असून त्याला ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मँगो केक्स, पेस्ट्रीज आणि क्रीमी डेझर्ट्समुळे आंबा प्रेमींसाठी हा सीझन आणखी खास बनला आहे.
याशिवाय ब्रँडने #ForTheLoveOfMango हा खास सोशल मीडिया कॉन्टेस्टही सुरू केला आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी चाहत्यांनी त्यांच्या मजेशीर किंवा खास आंबा आठवणी सोशल मीडियावर शेअर करायच्या आहेत. तसेच @theobromapattiserie ला फॉलो करून आपल्या शहराचं नाव नमूद करायचं आहे. निवडक विजेत्यांना ₹500 चे व्हाउचर्स जिंकण्याची संधी मिळणार आहे.
आंबा प्रेमींसाठी सुरू करण्यात आलेली ही मोहीम सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असून चाहत्यांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अभिनेत्री जान्हवी कपूरची स्टाइल, आंब्यावरील प्रेम आणि थिओब्रोमाचे खास मँगो डेझर्ट्स यामुळे ही मोहीम सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.