(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)
ए. हर्षा दिग्दर्शित आणि साजिद नाडियाडवाला निर्मित ‘बागी ४’ या ॲक्शन थ्रिलर चित्रपटाचे चित्रीकरण १८ नोव्हेंबर २०२४ रोजी सुरू झाले होते, जे आज संपले आहे. ‘बागी’ फ्रँचायझीच्या अभिनेता टायगरने स्वतः त्याच्या सोशल मीडिया हँडलवर ही माहिती शेअर केली आहे. आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. ‘बागी ४’ चे शूटिंग संपताच टायगर श्रॉफने त्याचे अॅब्स दाखवत सोशल मीडियावर स्वतःचे फोटो शेअर केले आहे.
कंगना रणौतला राजकारणात नाही येतेय मज्जा…; म्हणाली, “समाजसेवा करणे ही माझी…”
टायगर श्रॉफची पोस्ट चर्चेत
बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफने आज इस्टाग्रामवर त्याच्या अॅब्स दाखवतानाचे अनेक उत्तम फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसह टायगर हातात क्लॅप बोर्ड धरून असल्याचे दिसून आले. या फोटोंसह टायगरने ‘बागी ४’ च्या शूटिंगच्या समाप्तीची माहिती दिली आणि कॅप्शनमध्ये लिहिले, ‘आणि शेवटी हे संपले… तुमच्या सर्वांच्या प्रेमाबद्दल आणि या फ्रँचायझीला इतक्या दूरपर्यंत पोहोचण्याची परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद. मला वाटत नाही की मी कधीही एखाद्या चित्रपटासाठी इतके रक्त सांडले आहे. हा तुमच्यासाठी #४ लवकरच येत आहे.’ असे लिहून अभिनेत्याने ही पोस्ट शेअर कलेची आहे.
सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी दिल्या कमेंट्स
टायगर श्रॉफच्या या पोस्टवर आयशा श्रॉफने लिहिले, ‘पहिल्या दिवशी पहिला शो आणि नंतर किमान दहापट जास्त कामाई’, टायगरची बहीण कृष्णा जॅकी श्रॉफने लिहिले, ‘हा पुढचा टप्पा आहे. वाट पाहू शकत नाही’, एका चाहत्याने लिहिले, ‘मी टायगर श्रॉफची खूप मोठी चाहता आहे भाऊ ११ वर्षांपासून तुझ्यावर करतो @tigerjackieshroff’, दुसऱ्या चाहत्याने लिहिले, ‘तुझ्या धमाकेदार पुनरागमनाची वाट पाहत आहे’, दुसऱ्या चाहत्याने लिहिले, ‘यासाठी खूप उत्सुक आहे, यावेळी काहीतरी वेगळे.’ असे लिहून चाहत्यांनी त्याला प्रतिसाद दिला आहे.
कंगना रणौतला राजकारणात नाही येतेय मज्जा…; म्हणाली, “समाजसेवा करणे ही माझी…”
‘बागी ४’ हा चित्रपट ए. हर्षा दिग्दर्शित करत आहे, तर हा चित्रपट साजिद नाडियावाला यांच्या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत तयार केला जात आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफ व्यतिरिक्त संजय दत्त आणि सोनम बाजवा देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ५ सप्टेंबर २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तसेच आता चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी आणि चित्रपटाची कथा जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.