(फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)
IMDb हे मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध आणि विश्वसनीय स्रोताने आज 2024 मधील सर्वाधिक प्रसिद्ध भारतीय कलाकारांची टॉप 10 यादी घोषित केली आहे. IMDb वरील जगभरातील दर महा 25 कोटींहून अधिक दर्शकांच्या वास्तविक पेज व्ह्यूजनुसार ही क्रमवारी निर्धारित झाली. तृप्ती डिमरी, या 2024 मधील क्रमांक 1 च्या भारतीय अभिनेत्रीने या वर्षी बॅड न्यूज, विकी विद्या का वो वाला विडियो, आणि भूल भुलैया 3 या तीन चित्रपटांमध्ये भुमिका केल्या आणि जगभरातील चाहत्यांनी या भुमिकांचे कौतुक केले. अभिनेत्रीने या यादीत आपके स्थान मिळवले आहे.
IMDb इंडियाच्या प्रमुख यामिनी पतोडिया यांनी आपले मत स्पष्ट केले आहे. त्या म्हणाल्या की, “2024 मधील सर्वाधिक प्रसिद्ध भारतीय कलाकारांच्या IMDb यादीमध्ये प्रस्थापित दिग्गज आणि उभरत्या प्रतिभावान कलाकारांच्या समावेशासह भारतीय मनोरंजन जगताचे वैविध्यपूर्ण प्रतिबिंब दिसते, आमच्या वार्षिक यादीमध्ये जागतिक श्रोत्यांच्या बदलणा-या आवडींचे प्रतिबिंब उमटते आणि शाहरूख खान आणि ऐश्वर्या राय बच्चन असे दिग्गज कलाकार आजही दर्शकांची मने आकर्षित करत आहेत आणि त्यासह तृप्ती डिमरी आणि शर्वरी हे नवीन कलाकारसुद्धा प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहेत. भारतीय चित्रपट आणि त्यातील कलाकारांना मिळणारी आंतरराष्ट्रीय मान्यता कशी वाढत आहे, हे यावर्षीच्या यादीतून दिसून येत आहे.” असे त्यांनी सांगितले.
आपल्या चाहत्यांना धन्यवाद देताना तृप्ती डिमरीने म्हंटले, “2024 च्या IMDb सर्वाधिक लोकप्रिय भारतीय कलाकारांच्या यादीमध्ये क्रमांक 1 वर स्थान मिळणे, हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. माझ्या चाहत्यांचे अविश्वसनीय सहकार्य आणि मला ज्यांच्यासोबत काम करता आले त्या सर्वांचे परिश्रम या सगळ्याची ही पावती आहे. या वर्षामध्ये मी अनेक उत्साहवर्धक प्रोजेक्टसवर काम केले आहे आणि भूल भुलैया 3 सह 2024 चा शेवट होत आहे आणि असे हे माझ्यासाठी संस्मरणीय वर्ष राहिले आहे. मी या प्रेरणादायी उद्योगाचा भाग बनून पुढील काळात नवीन प्रोजेक्टसवर काम करत राहील.” असे अभिनेत्रीने सांगितले.
IMDb च्या 2024 च्या सर्वाधिक प्रसिद्ध भारतीय कलाकारांच्या टॉप 10 यादीमध्ये असे कलाकार आहेत जे संपूर्ण 2024 मध्ये IMDb च्या साप्ताहिक क्रमवारीमध्ये सातत्याने सर्वाधिक रँकिंग असलेले होते. जगभरातून IMDb वर दर वर्षी येणा-या 25 कोटींपेक्षा जास्त वास्तविक पेज व्ह्यूजनुसार हे रँकिंग निर्धारित झाले आहे.
या वर्षातील सर्वांत प्रसिद्ध भारतीय कलाकारांबद्दल माहिती:
दीपिका पदुकोनच्या (क्र. 2) – या वर्षी अभिनेत्रीचे तीन चित्रपट समोर आले. फायटर, कल्की 2898 एडी, आणि सिंघम अगेन. तिने कल्की 2898 एडीद्वारे तेलुगूमध्ये पदार्पण केले आणि तिच्या करिअरचा हा पुढचा टप्पा ठरला.
.
इशान खट्टरने (क्र. 3) – अभिनेत्याने दोन आंतरराष्ट्रीय टीव्ही मालिकांद्वारे आपल्या चाहत्यांची संख्या आणखी वाढवली. द परफेक्ट कपल मध्ये त्याने निकोल किडमन, लिएव्ह श्राईबर आणि ईव्ह ह्यूसनसोबत काम केले आहे.
Ramayana: रणबीर कपूरच्या रामायणला मिळाला ‘लक्ष्मण’, या टीव्ही अभिनेत्याच्या हाती लागला चित्रपट!
सोभिता धुलीपाला (क्र. 5) – अभिनेत्रीने या वर्षी मंकी मॅन सह हॉलीवूडमध्ये आपले पदार्पण केले. तिने कल्की 2898 एडीमध्ये दीपिका पदुकोनसाठी तेलुगूमध्ये डबिंगही केले. तसेच, तेलुगू कलाकार नागा चैतन्य अक्कीनेनी सोबत तिच्या झालेल्या एंगेजमेंटमुळेही ती यावर्षी चर्चेत आली.
शर्वरी (क्र. 6) – अभिनेत्रीचे हे वर्ष तीन भुमिकांसह अभूतपूर्व गेले. मुंज्या, महाराज आणि वेदा. तिला ऑगस्टमध्ये IMDb “ब्रेकआउट स्टार” स्टारमीटर पुरस्कार देखील मिळाला.
आलिया भट्ट (क्र. 9) – अभिनेत्रीने चाहत्यांमध्ये असलेली आपली आवड टिकवून ठेवली आहे आणि सलग तिस-या वर्षी ती या यादीमध्ये आली आहे. 2024 मध्ये पॅरीस फॅशन वीकमध्ये तिने पदार्पण केले आणि यावर्षी थिएटरमध्ये अभिनेत्रीचा जिगरा चित्रपट देखील आला होता ज्याची निर्मितीसुद्धा तिने केली होती.