(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
ॲनिमल या चित्रपटानंतर तृप्ती डिमरी या अभिनेत्रींच्या हातात अनेक मोठे प्रोजेक्ट्स आले आहेत. विकी कौशलसोबत बॅड न्यूजनंतर, कार्तिक आर्यनसोबतचा तिचा भूल भुलैया 3 आणि राजकुमार रावसोबतचा विकी विद्याचा व्हिडिओ रिलीजसाठी तयार आहे. तसेच अभिनेत्री अनेक आगामी चित्रपटामध्ये झळकणार आहे. तसेच, आता बातमी येत आहे की ती लवकरच मोठ्या पडद्यावर साऊथ स्टार धनुषसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘तेरे इश्क में’ असून हा चित्रपट आनंद एल राय दिग्दर्शित करणार आहेत. मात्र, या चित्रपटाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
काय म्हणाले आनंद एल राय कलाकारांबद्दल?
अलीकडेच पीपिंगमूनने आपल्या रिपोर्टमध्ये दावा केला होता की या चित्रपटात तृप्ती डिमरी कास्ट केली जाणार आहे. आता झूमला दिलेल्या मुलाखतीत आनंद एल राय यांनी कलाकारांबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. दिग्दर्शक आनंद म्हणाले, ‘अट्टाहास चालू द्या. मी लवकरच माझ्या कलाकारांचा खुलासा करेन.” असे त्यांनी या मुलाखतीत सांगितले.
हे देखील वाचा- कोल्डप्लेची तिकीट विक्री वेबसाइट क्रॅश; नेटकऱ्यांनी शेअर केले मीम्स म्हणाले… ‘आता बॅंड स्वत:च देईल तिकीट’
चित्रपटाची कथा रांझनासारखी असणार?
‘तेरे इश्क में’ या चित्रपटाची गेल्या वर्षी घोषणा करण्यात आली होती परंतु धनुषच्या काही पूर्व वचनबद्धतेमुळे त्याचे शूटिंग सुरू होण्यास विलंब झाला होता. मात्र, आता बातम्या येत आहेत की या ऑक्टोबरमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू होऊ शकते. याआधी आनंद एल राय यांनी 2013 मध्ये धनुषचा ‘रांझना’ चित्रपट दिग्दर्शित केला होता. तेव्हापासून या दोन्ही चित्रपटांमध्ये काहीतरी संबंध असल्याचे सांगितले जात होते. यावरही आनंदने आपले मत व्यक्त करत तेरे इश्कमध्ये वेगळीच कथा असल्याचे सांगितले. पण या चित्रपटामध्ये तुम्हाला रांझनासारखा उत्साह, ऊर्जा, भावना आणि मूड नक्कीच पाहायला मिळणार आहे.