फोटो सौजन्य: सोशल मीडिया
ब्रिटीश म्युझिक बँड कोल्डप्ले आता लवकरच मुंबईत होणार आहे. या शोची घोषणा करताच भारतात तिकीटांसाठी शर्यत सुरू झाली. या कॉन्सर्टच्या तिकीटांची विक्री बुक माय शो अॅपवर काल दुपारी 12 वाजल्यापासून सुरू करण्यात आली होती. पण कोल्डप्लेची लोकप्रियता पाहता, भारतीयांनी तिकीट बुकींगसाठी मोठ्या संख्येने रांग लावली. पण यामुळे वेबसाईट क्रॅश झाली. पण तिकिटांची ही स्पर्धा बुक माय शो ॲपपुरती मर्यादित न राहता सोशल मीडियावरही ही स्पर्धा सुरू होती.
भारतात, इंटरनेट लोकांना कोणत्याही विषयावर ‘आवाज’ करण्याची संधी नेहमीच हवी असते. त्यामुळे या मुद्द्यावरून गदारोळही झाला होता. कोल्डप्लेच्या शोच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर निर्माण झालेला गोंधळ उडाला. वेबसाईट क्रॅश झाल्यामुळे याची सर्वत्र चर्चा होऊ लागली. नेटकऱ्यांनी बुक माय शो अपवर मीम्स शेअर करायला सुरीवात केली.
तिकीट न मिळाल्यामुळे एका युजरने दुख: व्यक्त करत म्हटले आहे की, भाऊ, कोल्डप्लेचे तिकीट उपलब्ध नाही. 1 मिनिटात 10 लाख+ प्रतीक्षा यादीत गेले. हे लोक नासा मध्ये बसून तिकीट बुक करत आहेत का? प्रत्येकजण माझ्यासारखे 5G वापरत आहे. मला ते थेट पहायचे होते.
Nahi hua bhai Coldplay ka tickets book. Bhai 1 minute main 10 lakh + waiting list main chala gaya. Ye log kya NASA main baithke tickets book krrhe hain??? Sab toh meri hi tarah 5g use krrhe hain.
Bht Mann tha bhai live dekhne ka🙂💔
— Juhel (@Juhel_retd) September 22, 2024
व्हायरल होत असलेल्या मीम्समध्ये हिंदी सिरीयलमधील गोपी बहु चे मीम्स देखील पाहायला मिळत आहेत. या मीमला कॅप्शन देत म्हटले आहे की, बुक माय शो चा इंजिनियर
Chief engineer at #BookMyShow pic.twitter.com/zkNVMaqWXF
— Sagar (@sagarcasm) September 22, 2024
एका युजरने कोल्डप्लेची तिकिटे मिळाल्यानंतर मनात येणाऱ्या भावनांचा व्हिडिओ शेअर केला आहे.
How it feels of getting Coldplay ticket :#Coldplay pic.twitter.com/EyZxoaN3mA
— New Kidz on the Blog 🏴 (@NKOTB_07) September 22, 2024
एका युजरने कोल्डप्ले शोचे नियोजन आणि तिकिटाची किंमत तपासल्यानंतरची प्रतिक्रिया यातील फरक निदर्शनास आणून दिला. हॅशटॅग दिला- #ColdplayIndia
Planning for the coldplay show Vs reaction after checking ticket price #ColdplayIndia pic.twitter.com/OfSoLJnycL
— Erick Massey (@MasseyErick) September 9, 2016
असे अनेक मीम्स सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहेत.जवळपास नऊ वर्षांनंतर कोल्डप्ले बॅंडचे भारतात कॉन्सर्ट होणार आहे. भारतातील अनेक चाहते कोल्डप्ले बॅंडची आतुरतेने वाट पाहत आहेत. हे कॉन्सर्ट नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये जानेवारी 2025 18 आणि 19 तारखेला होणार आहे. बुक माय शो अॅपवर या कॉन्सर्टची कमीत कमी किंमत 2500, तर याची जास्त जास्त किंमत 35000 इतकी आहे. पण बेवसाईट क्रॅश झाल्यामुळे अनेक चाहते आपले दुख: व्यक्त करत आहेत.