‘वेदा’ चित्रपटामधील नवीन गाण ‘जरूरत से ज्यादा’ ज्यामध्ये तमन्ना भाटिया आणि जॉन अब्राहम सोबत काम करताना दिसणार आहेत. अमाल मलिकने अरिजित सिंगच्या मनमोहक गायनाने संगीतबद्ध केलेला हा रोमँटिक ट्रक नक्कीच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा आहे. कुणाल वर्मा यांनी लिहिलेले हे गाणं “वेदा” मधल खास गाणं ठरणार असून तमन्ना आणि जॉन यांची जुगबंदी यातून अनुभवयाला मिळणार आहे. तमन्नाचे चाहते जॉनसोबतच्या तिच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीची प्रशंसा करतात दिसत आहेत. तर ‘वेदा’ हा चित्रपट १५ ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित होणार असून, या दोघांना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.
या चित्रपटातील गाण्याबद्दल बोलताना जॉन अब्राहम म्हणाला की, “जरूरत से ज्यादा” मध्ये माझी भावनिक आणि रोमँटिक बाजू दिसणार आहे तमन्ना सोबत हे गाणं करताना खरंच मज्जा आली आहे.” असे त्याने सांगितले. तसेच या गाण्याचा अनुभव चाहत्यांना चांगलाच मिळणार आहे. याचदरम्यान अरिजित सिंगने हे गाणं गायल्यामुळे त्याच्या चाहत्यांना देखील मेजवानी मिळाली आहे.
तसेच या गाण्याबद्दल आणि पत्राबद्दल सांगताना अभिनेत्री तमन्ना भाटिया म्हणाली की, “पहिल्यांदा जॉनसोबत काम करणे हा एक अविश्वसनीय अनुभव होता. या भूमिकेसाठी आम्ही सोबत आलो आहोत आणि आमची केमिस्ट्री आणखी खास बनली आहे. हे गाणं प्रेम आणि आठवणींनी भरलेला मनापासूनचा प्रवास आहे आणि मला विश्वास आहे की हे गाण सगळ्यांना नक्की आवडेल. असे अभिनेत्रीने सांगितले. आता या गाण्यासह प्रेक्षकांना या चित्रपटाची देखील आतुरता आहे.
निखिल अडवाणी दिग्दर्शित आणि असीम अरोरा लिखित “वेदा” ची निर्मिती झी स्टुडिओज, उमेश केआर बन्सल, मोनिषा अडवाणी, मधु भोजवानी, जॉन अब्राहम आणि मिन्नाक्षी दास यांनी केली आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम, शर्वरी, अभिषेक बॅनर्जी आणि तमन्ना भाटिया यांच्या भूमिका पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट 15 ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून सर्व प्रेक्षकांना या चित्रपटाचा अनुभव घेता येणार आहे.