(फोटो सौजन्य - x अकाउंट)
अभिनेता विकी कौशल, रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘छावा’ चित्रपटाची केझ चाहत्यांमध्ये वाढतच चालली आहे. ॲडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत चित्रपट चांगले यश मिळवत आहे. परंतु आता याचदरम्यान चित्रपटाच्या यशासाठी अभिनेता विकी कौशल महाकुंभात हजेरी लावताना दिसला आहे. ‘छावा’ चित्रपटाच्या रिलीजच्या एक दिवस आधीच अभिनेता महाकुंभात पोहचला आहे. ज्याचे व्हिडीओ आणि फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
विकी कौशल पोहचला महाकुंभात
अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या आगामी चित्रपट ‘छावा’ साठी खूप चर्चेत आहे. हा चित्रपट उद्या म्हणजेच १४ फेब्रुवारीला संपूर्ण सिनेमागृहात दाखल होणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. आता याच चित्रपटाच्या यशासाठी चित्रपटाच्या रिलीजच्या एक दिवस आधीच अभिनेता महाकुंभात पोहचला आहे. ज्याचे व्हिडीओ आता सोशल मीडियावर चर्चेत आहेत. व्हिडीओमध्ये अभिनेता बोटीत बसून जाताना दिसत असून तो चाहत्यांना नमस्कार करताना दिसत आहे.
#WATCH | Prayagraj, Uttar Pradesh | Actor Vicky Kaushal visits Mahakumbh 2025. pic.twitter.com/GrnSQtVnkO
— ANI (@ANI) February 13, 2025
चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंगमध्ये धमाकेदार कमाई
सोमवारी, ॲडव्हान्स बुकिंगच्या पहिल्या दिवशी, संध्याकाळपर्यंत चित्रपटाची सुमारे ४ कोटी रुपयांची तिकिटे विकली गेली होती. पण, पुढच्या दोन दिवसांतही, चित्रपटाला तिकिटांची तिकिटे विकण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे दिसून आले आहे. बुधवारी दुपारपर्यंत चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग सुमारे ६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे आणि यापैकी ४ कोटी रुपयांची तिकिटे एकट्या महाराष्ट्रात विकली गेली आहेत, उर्वरित देशभरात विकली गेली आहेत. हा हचित्रपट उद्या सिनेमागृहात काय धुमाकूळ घालतो हे पाहणे उत्कंठाचे ठरणार आहे.
स्वप्नीलच्या सुपरहिट ‘मितवा’ चित्रपटाला १० वर्ष पूर्ण; चित्रपट चाहत्यांसाठी आजही आहे तितकाच खास!
अभिनेत्याने चित्रपटासाठी घेतली मेहनत
प्रसिद्ध मराठी लेखक शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ या कादंबरीवर आधारित, सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी याच नावाचा हा महत्त्वाकांक्षी चित्रपट बनवला आहे. चित्रपटात संभाजीची भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशलने यासाठी खूप मेहनत घेतली आहे. यशराज फिल्म्सच्या सेटवर तो अनेक महिन्यांपासून कठोर परिश्रम करत आहे. त्याच्या मागील चित्रपट ‘बॅड न्यूज’च्या प्रमोशन दरम्यानही, तो संभाजींच्या भूमिकेसाठी दाढी आणि मिश्या वाढवताना दिसला होता. तथापि, तो दाढीशिवाय ‘छावा’ चा प्रचार करत आहे. ‘छावा’ चित्रपटाकडून चित्रपटसृष्टीला खूप अपेक्षा आहेत. रश्मिका मंदानासमोर मराठी व्यक्तिरेखेत स्वतःला सिद्ध करण्याचे आव्हान आहे. विकी कौशलच्या लूकची प्रशंसा होत आहे.