(फोटो सौजन्य - x अकाउंट)
गेल्या वर्षी, विक्रांत मेस्सीने त्याच्या कुटुंबावर आणि आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी अभिनयातून ब्रेक घेण्याची घोषणा केली होती. अभिनेत्याने स्पष्टपणे सांगितले होते की हा ब्रेक काही महिन्यांसाठी असणार आहे. अलीकडेच, विक्रांतने या करिअर ब्रेकबद्दल आपला अनुभव शेअर केला आहे. तो त्याच्या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘आँखों की गुस्ताखियां’ या चित्रपटाबद्दल देखील उत्सुक आहे. तसेच अभिनेता आता पुन्हा चित्रपटामध्ये परतणार आहे.
विक्रांतचा कारकिर्दीतील ब्रेक संपला
पीटीआयशी बोलताना विक्रांत मेस्सी म्हणाला, ‘माझा ब्रेक संपला आहे. मी फक्त सहा महिन्यांचा ब्रेक घेतला होता. आता मला सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली आहेत. वैयक्तिक आयुष्य असो किंवा करिअर, प्रत्येक गोष्टीबद्दल माझा दृष्टिकोन पूर्णपणे स्पष्ट झाला आहे. या ब्रेकमध्ये मला जाणवले की अभिनय हा माझ्या आयुष्याचा एक भाग आहे आणि इतर अनेक गोष्टी देखील माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत.’ असे अभिनेता म्हणाला.
हॉलिवूड वॉक ऑफ फेम मिळाल्यानंतर दीपिकाने एका शब्दात दिली प्रतिक्रिया, काय म्हणाली अभिनेत्री ?
कुटुंबासोबत अभिनेत्याने घालवला वेळ
विक्रांतने त्याच्या कारकिर्दीच्या ब्रेक दरम्यान त्याच्या कुटुंबासोबत बराच वेळ घालवला. तो म्हणतो, ‘मी माझा मुलगा वरदानसोबत वेळ घालवला, बरेच चित्रपट पाहिले. मला कोणत्या गोष्टींवर काम करायचे आहे यावर मी नोट्स बनवल्या. अभिनेता म्हणून स्वतःला सुधारण्याचा माझा प्रयत्न मी करत आहे.’ विक्रांत पुढे म्हणाला की, ‘ब्रेकनंतर माझ्यात एक थांबण्याची भावना देखील निर्माण झाली आहे. मी माझे सर्व चित्रपट पाहिले आणि स्वतःकडे लक्ष दिले. मी त्या चित्रपटांमध्ये अधिक चांगले काम करू शकलो असतो. आता मी ज्या चित्रपटांचा भाग बनत आहे त्यात मी या गोष्टी लक्षात ठेवेन.’ असे अभिनेता म्हणाला आहे.
निर्मात्यांनी दाखवली ‘Ramayana’ची पहिली झलक, रणबीर आणि यशला एकत्र पाहून चाहते खूश
‘आँखों की गुस्ताखियां’ बद्दल उत्सुक
‘आँखों की गुस्ताखियां’ या चित्रपटात विक्रांत मेस्सी शनाया कपूरची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट ११ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘आँखों की गुस्ताखियां’ हा चित्रपट रस्किन बाँडच्या ‘द आयज हॅव इट’ या लघुकथेवर आधारित आहे. विक्रांत हा लेखक रस्किन बाँडचा चाहता आहे. तो या चित्रपटात एका अंध व्यक्तीची भूमिका साकारत आहे. विक्रांत म्हणतो, ‘या भूमिकेने अंध व्यक्तींबद्दलच्या माझ्या समजुतीला आव्हान दिले आहे.’