(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)
हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर स्टारर ‘वॉर २’ चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी फारसा वेळ शिल्लक नाही. हा चित्रपट काही दिवसांतच थिएटरमध्ये दाखल होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. इतकेच नाही तर चित्रपटाचा प्री-रिलीज प्रोमोही समोर आला आहे. जो पाहून चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी आणखी उत्सुक आहेत.
‘वॉर २’ चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग
sacnilk.com नुसार, ‘वॉर २’ चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगमध्ये १६५०३ हिंदी तिकिटे विकली गेली आहेत. या चित्रपटाची तमिळ भाषेतील १२१२ तिकिटे आणि तेलुगू भाषेतील ७५९ तिकिटे विकली गेली आहेत. याशिवाय, हिंदी आयमॅक्स २ डीची ४१० तिकिटे विकली गेली आहेत. एकूणच, भारतात या चित्रपटाची १८८८४ तिकिटे विकली गेली आहेत.
‘तांबव्याचा विष्णूबाळा’ मोठ्या पडद्यावर तेही चार भाषांमध्ये! भाऊबंदकीचा वाद येणार चवाट्यावर
चित्रपटाचा प्री-रिलीज प्रोमो
एवढंच नाही तर अलिकडेच निर्मात्यांनी चित्रपटाचा प्री-रिलीज प्रोमो देखील शेअर केला आहे. हा प्रोमो व्हिडिओ yrf च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. प्रोमो शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, १४ ऑगस्टपासून चित्रपटगृहांमध्ये कार्नेज पाहण्यासाठी तुम्ही तयार आहात का? दोघेही या चित्रपटामध्ये ॲक्शन भूमिकेत दिसणार आहेत. चाहते या दोघांचीही केमिस्ट्री पाहण्यासाठी आतुर आहेत.
‘वॉर २’ मध्ये दिसणार जबरदस्त अॅक्शन
कॅप्शनमध्ये पुढे लिहिले आहे की, “वॉर २ साठी आताच तिकिटे बुक करा आणि आम्ही तुम्हाला असा अनुभव देत आहोत जो तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील.” असे लिहून हा प्री-रिलीज प्रोमो शेअर करण्यात आला आहे. वॉर २ जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषेत प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचा प्री-रिलीज प्रोमो व्हिडिओ देखील अद्भुत आहे आणि वापरकर्ते त्यावर जोरदार कमेंट करत आहेत.
टायगर श्रॉफच्या ‘बागी ४’ च्या टीझरला मिळाले ‘A’ प्रमाणपत्र, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
प्रोमो व्हिडिओमध्ये काय आहे?
‘वॉर २’ चित्रपटाच्या प्रोमो व्हिडिओबद्दल बोलायचे झाले तर, पार्श्वभूमीवर व्हॉइसओव्हर सुरू आहे आणि हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. दोघांचा अॅक्शन मोड अद्भुत आहे आणि दोघेही जोरदार भांडत आहेत. प्री-रिलीज प्रोमो व्हिडिओमध्ये, दोन्ही स्टार्सच्या डोळ्यात एक वेगळाच जोश दिसतो आहे. दुसरीकडे, जर आपण चित्रपटाच्या रिलीजबद्दल बोललो तर, हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी रिलीजसाठी सज्ज आहे.