
फोटो सौजन्य - Social Media
ध्रष्टपुष्ट शरीर आणि गडद रंगाचा सूट असणाऱ्या Kevin Kunta चे खरे नाव अब्दू कादिर सोवे आहे. तो मूळचा आफ्रिकेतील गॅम्बिया देशातील आहे. 1998 मध्ये जन्मलेला Kevin 27 वर्षांचा आहे. Kevin Kunta विविध मार्शल आर्ट्समध्ये पारंगत आहे. मामा लामिन ऑफ बार्रा या टोपण नावाने गॅम्बिया रेसलिंग असोसिएशनमध्ये त्याचा उल्लेख केला जातो.
मुळात, रामचरणच्या चाहत्यांना वाटतं की Kevin Kunta ची ओळख रामचरणमुळे झाली आहे. परंतु, Kevin Kunta त्या आधीपासून सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. त्याने MMA ( Mixed Martial Arts ) मध्ये स्वतःचे नाव अगदी सुवर्ण अक्षरात कोरले आहे. दक्षिण भारतात सिनेकलाकारांना विशेष मान आहे. त्यामुळे, त्यांच्या आयुष्याशी संबंधित लोकांना दाक्षिणात्य सिनेचाहते नेहमी लक्षात ठेवतात. असेच एक नाव Ram charan चा बॉडीगार्ड Kevin Kunta चे आहे.
एका मुलाखतीत स्वतः रामचरणने Kevin Kunta विषय सांगितले आहे. रामचरण म्हणतो की, “Kevin ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे मी त्याला आता घराबाहेरही पाठवत नाही. मला भीती वाटते की ‘त्याला कुणी चॉकलेट किंवा बिस्कीट देईल आणि माझ्याविषयी माहिती काढून घेईल.” रामचरणच्या चाहत्यांमध्ये Kevin हा आता ओळखीचा चेहरा आहे.