(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
Bigg Boss 19: सलमान खानचा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 19’ दिवसेंदिवस अधिक रंगतदार होत चालला आहे. घरातील वाद, दोस्ती, कटकारस्थानं आणि टास्कमधील चुरस यामुळे प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन होत आहे. आता या आठवड्याच्या ‘वीकेंड का वार’ भागात ८ नॉमिनेटेड स्पर्धकांपैकी एका स्पर्धकाला घराबाहेरचा रस्ता दाखवला जाणार आहे. कारण, घरातील सदस्यांनी ८ स्पर्धकांना एलिमिनेशनसाठी नामांकित केलं आहे. यामध्ये अशनूर कौर, प्रणीत मोरे, नेहल चुडासमा, अमाल मलिक, झीशान कादरी, कुनिका सदानंद, तान्या मित्तल आणि नीलम गिरी यांचा समावेश आहे.
नीलम गिरीवर गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर #SaveNeelam अशी मोहिम सुरु होती. तिच्या मैत्रिणींसह चाहत्यांनी तिला वाचवण्यासाठी अनेक पोस्ट्स केल्या. मात्र, या सर्व प्रयत्नांनंतरही ती पुन्हा एकदा एलिमिनेशनच्या रडारवर आहे.
🚨 Nominated Contestants for this week ☆ Amaal Mallik
☆ Nehal Chudasama
☆ Kunickka Sadanand
☆ Ashnoor Kaur
☆ Neelam Giri
☆ Pranit More
☆ Tanya Mittal
☆ Zeishan Quadri Comments – who will EVICT? — BBTak (@BiggBoss_Tak) September 28, 2025
तिच्या खेळातील सहभाग आणि प्रेक्षकांशी कनेक्ट कमी असल्याने, ती सध्या घराबाहेर जाण्याच्या सर्वाधिक शक्यतेच्या यादीत आहे. नेहल चुडासमा नुकतीच गुप्त खोलीतून बाहेर आली असली, तरी तिच्यावर पुन्हा नामांकनाची कुरघोडी झाली आहे. घरात तिची उपस्थिती ठळक नसल्याचा आरोप होत आहे. घरातील आठ सदस्य नामांकनाच्या फेऱ्यात असून प्रेक्षकांचे लक्ष यापैकी कोण घराबाहेर जाणार? याकडे लागले आहे. त्यातल्या अशनूर कौर आणि प्रणीत मोरे यांचे गेम पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने उलगडताना दिसत आहेत.
‘कोकण हार्टेड गर्ल’चा नवा प्रवास, अंकिता आणि कुणालचं प्रोडक्शन हाऊस सुरु
अशनूर कौरचा गेम सध्या भक्कमपणे पुढे सरकत आहे. ती घरात स्पष्टपणे दिसते, तिचं मत ठामपणे मांडते आणि वादांमध्येही सक्रिय सहभाग घेत असल्याचं सातत्यानं पाहायला मिळतं.अभिषेक बजाजसोबत तिचं लव्ह अँगल, त्यातील नाट्यमय वळणं आणि काही सदस्यांशी सुरू असलेली शाब्दिक झुंज, यामुळे तिचा ट्रॅक सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधतो आहे.प्रणीत मोरेचा इतर स्पर्धकांपेक्षा त्याचा सहभाग कमी जाणवतोय. तरीही, पाचव्या आठवड्यात तो पॉप्युलरिटी रँकिंगमध्ये टॉप ५ मध्ये होता, प्रेक्षकांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता असूनही, प्रणीतच्या खेळात ठोस वाटेल अशी ऊर्जा अद्याप दिसून आलेली नाही.