Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये कलाकार मंडळी दाखवणार पाक कौशल्य, कोण कोण सेलिब्रिटी होणार सहभागी ?

या नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील “सेलिब्रिटी मास्टरशेफ- अब उन सबकी सीटी बजेगी!”मध्ये जबरदस्त पाककला स्पर्धा रंगणार आहे. या शोमध्ये काही सेलिब्रिटीज आपले पाककौशल्य दाखवणार आहेत.

  • By चेतन बोडके
Updated On: Jan 01, 2025 | 03:13 PM
‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये कलाकार मंडळी दाखवणार पाक कौशल्य, कोण कोण सेलिब्रिटी होणार सहभागी ?

‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये कलाकार मंडळी दाखवणार पाक कौशल्य, कोण कोण सेलिब्रिटी होणार सहभागी ?

Follow Us
Close
Follow Us:

नवीन वर्षाच्या सुरूवातीला प्रेक्षकांच्या भेटीला सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील “सेलिब्रिटी मास्टरशेफ- अब उन सबकी सीटी बजेगी!”मध्ये जबरदस्त पाककला स्पर्धा रंगणार आहे. या शोमध्ये सेलिब्रिटीजचा एक मजेदार ग्रुप सहभागी होत आहे, जो आपले पाककौशल्य दाखवण्यासाठी सज्ज होत आहे.

पुन्हा एकदा हास्यजत्रेची टीम प्रेक्षकांना खळखळून हसवणार, चित्रपटातून देणार धमाल मनोरंजनाची ट्रीट

येत्या सीझनमध्ये सामील होत असलेल्या कलाकारांमध्ये उषा नाडकर्णी आणि निक्की तांबोळी यांचाही समावेश आहे. या दोन्ही प्रतिभावान अभिनेत्री आनंदी, काहीशा मस्तीखोर स्वभावाच्या आहेत, ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाला एक तडका मिळेल. एकीकडे, निक्कीच्या बिनधास्त व्यक्तिमत्त्वाला साजेसे पदार्थ, किचनमधल्या तिच्या नाट्यमय हालचाली दिसतील. तर दुसरीकडे उषा नाडकर्णीच्या अनेक वर्षांच्या अनुभवात मुरलेले सुजाणपण आणि चमचमीतपणा यांचे मिश्रण दिसेल. इतर सेलिब्रिटीजसोबतच्या त्यांच्या साहचर्यातून निर्माण होणारा पिढ्या तसेच पाकशैलीतील संघर्ष नक्कीच खुमासदार असेल.

 

रिॲलिटी टीव्ही स्टार निक्की तांबोळी आता कुकिंग स्टार बनण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्यात धडाडी आहे आणि तिला स्पर्धेचा त्वेष आवडतो. पण यावेळी ती स्पर्धेत उतरली आहे ती आपल्या वडिलांकडून मान्यता मिळवण्यासाठी. निक्की उत्साहाने सांगते, “मी पहिल्यापासून तशी बंडखोरच आहे. पण मला वाटते, स्वतःशी प्रामाणिक राहणे हीच खरी सुखाची रेसिपी आहे. मी केलेली निवड अनेकदा माझ्या वडीलांना पसंत पडलेली नाही. पण सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये मी दाखल होणार हे समजल्यावर मात्र त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. आणि या गोष्टीचा मला आनंद वाटतो. माणसांशी नाते जोडणे आणि जखमा भरून काढणे हे खाद्य पदार्थांना छान जमते. मला आशा आहे की, या अनुभवातून मी माझे पाककौशल्य दाखवू शकेन आणि माझ्या कुटुंबाची मान ताठ करू शकेन.”

Diljit Dosanjh: दिलजीत पुन्हा अडकला वादात, कॉन्सर्टमध्ये गायलेल्या गाण्यावरून गोंधळ; कायदेशीर करणार कारवाई?

दुसरीकडे, वयाच्या ७८ व्या वर्षीही उषा नाडकर्णींचा उत्साह दांडगा आहे. त्या देखील तितक्याच उत्साहाने या पाककलेच्या रिंगणात उतरत आहेत. त्यांच्यातील या उत्साहामुळेच त्या उद्योगात सगळ्यांच्या लाडक्या आहेत. बोलताना उषा नाडकर्णींचा उत्साह ओसंडून वाहत असतो की, “माझ्या वयात मला असे वाटत होते, माझे सगळे काही करून झाले आहे. पण आयुष्य नेहमी तुम्हाला सर्प्राइज देत असते. गेली काही दशके प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर आता किचनमध्ये स्थान मिळवण्यासाठी मी पदर खोचला आहे. मला कुकिंगची आवड पहिल्यापासूनच आहे. आता माझी ही आवड जगाशी शेअर करण्याची संधी मला मिळाली आहे. मास्टरशेफ इंडियाची सर्वात जेष्ठ स्पर्धक म्हणून मी जगाला हे दाखवून देणार आहे की, सळसळत्या तारुण्याइतकेच अनुभवाचे आणि सुजाणतेचेही मोल असते. कोणतेही आव्हान पुढे येऊ दे, मी झारे, पळ्या घेऊन सज्ज आहे!” यांच्यातील कोणता कलाकार होस्ट फराह खानला प्रभावित करू शकेल आणि सेलिब्रिटी शेफ परीक्षकांचे मन जिंकू शकेल?

Web Title: Celebrity masterchef rajiv adatia shares unseen pic with tejasswi prakash dipika kakar gaurav khanna and more

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2025 | 03:13 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.