(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ त्याच्या लुधियाना कॉन्सर्ट कायदेशीर वादामुळे चर्चेत आहे. चंदीगडचे सहाय्यक प्राध्यापक पंडितराव धरणवार यांनी नवीन वर्षाच्या आधी लुधियाना कॉन्सर्टमध्ये गायकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. यानंतर दिलजीत दोसांझबद्दल चर्चा सुरू झाली आहे. कॉन्सर्टमध्ये दिलजीतने अशी गाणी गायली की तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याआधी देखील गायक अल्कोहोलवर आधारित गाण्याबाबत अडचणीत अडकला होता. परंतु आता अभिनेता आणि गायक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
दिलजीत दोसांझला नोटीस मिळाली
दिलजीत दोसांझ यांना पंजाब सरकारच्या महिला आणि बाल विभागाच्या उपसंचालक आणि लुधियानाच्या जिल्हा आयुक्तांकडून औपचारिक नोटीस मिळाली आहे. या नोटीसमध्ये गायकाला 31 डिसेंबर रोजी होणाऱ्या लाईव्ह शोमध्ये काही गाणी न गाण्याची विनंती करण्यात आली होती. परंतु असे असूनही गायकाने कॉन्सर्टमध्ये गाणी गायली आहेत. आता याचबाबत त्याचावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
धूम्रपानाला प्रोत्साहन देणाऱ्या गाण्यांवर बंदी
या नोटीसमध्ये ‘5 तारा थेके’, ‘केस’, ‘पटियाला पेग’ सारखी गाणी न गाण्याची विनंती करण्यात आली आहे. तक्रारीत दिलजीत दोसांझला अशी वादग्रस्त गाणी न गाण्याची विनंती करण्यात आली होती. या इशाऱ्यांना न जुमानता, गायकाने किंचित बदल करून गाणे सुरूच ठेवले. गायकाने नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे.
2019 चा संदर्भ दिला
सहाय्यक प्राध्यापक पंडितराव धारेनवार यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, ‘पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या निर्णयात सन 2019 मध्ये पोलिसांना सूचना देण्यात आल्या होत्या. यामध्ये दारू, ड्रग्ज किंवा हिंसाचाराला प्रोत्साहन देणारी गाणी सार्वजनिक कार्यक्रमात वाजवू नयेत.’ असे त्यांनी सांगितले. दिलजीतच्या कॉन्सर्टनंतर महापालिकेने आयोजकांना ‘घनकचरा व्यवस्थापन नियम 2018’ चे उल्लंघन केल्याचा कारण देत चलन बजावले. कॉन्सर्टमध्ये कचरा आणि अस्वच्छता असल्याच्या तक्रारींमुळे महापालिका आयुक्तांनी हा दंड ठोठावला आहे.
पुन्हा एकदा हास्यजत्रेची टीम प्रेक्षकांना खळखळून हसवणार, चित्रपटातून देणार धमाल मनोरंजनाची ट्रीट
तेलंगणातही वाद सुरू झाला
तेलंगणा सरकारने दिलजीत दोसांझ, त्याची टीम आणि हैदराबादमधील हॉटेल नोव्होटेलला नोटीस बजावली आहे. तेलंगणाच्या जिल्हा कल्याण अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या नोटीसमध्ये गायकाला लाईव्ह शो दरम्यान पटियाला पाग आणि पंज तारा सारखी गाणी न गाण्यास सांगण्यात आले आहे.