विकी कौशलच्या 'छावा'ला नंबर १ होण्यासाठी 'या' दोन चित्रपटांचं चॅलेंज, धुलिवंदनाला केली सर्वाधिक कमाई
Chhaava Box Office Collection Day 29: लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटानं (Chhaava Movie) प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) दमदार कमाई करत सर्वांचेच लक्ष वेधलेय. अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) मुख्य भूमिकेत असलेला ‘छावा’ चित्रपट १४ फेब्रुवारीला रिलीज झाला आहे. दरम्यान, चित्रपट रिलीज होऊन सध्या २९ दिवस झाले आहेत, असं असलं तरीही चित्रपटाच्या कमाईचा वेग काही केल्या कमी झालेला नाही. दरम्यान, बॉलिवूड अभिनेता विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटानं धुळवडच्या दिवशी बॉक्स ऑफिसवर कमाईचा विक्रम रचलाय.
२९ व्या दिवशी ‘छावा’ चित्रपटाने शुक्रवारी म्हणजेच धुलिवंदनाच्या दिवशी चांगले कलेक्शन केले आहे. त्याने अनेक चित्रपटांना मागे टाकत आपलं नाणं बॉक्स ऑफिसवर खणखणीत वाजवले आहे. विकी कौशलचा चित्रपट आता ‘टॉप ३’ चित्रपटांमध्ये सहभागी झाला आहे. सध्या हा चित्रपट कलेक्शनच्या बाबतीत फक्त २ चित्रपटांपेक्षा मागे आहे. विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाने देशभरात ५०० कोटींचा गल्ला कमावला आहे. चित्रपटाने २९ दिवसांत देशांत ५४६. ७५ कोटींची कमाई केलेली असून जगभरात चित्रपटाने ७४१ कोटींची कमाई केलेली आहे. विकी कौशलचा ‘छावा’ चित्रपट हा बॉक्स ऑफिसवर अजूनही कमाल करत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन जवळजवळ एक महिना उलटला पण त्याची क्रेझ संपण्याची चिन्हे दिसत नाहीत.
‘सॅन्सिल्क’ने दिलेल्या कमाईच्या आकड्यांनुसार, ‘छावा’ चित्रपटाने २९ व्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी धुलिवंदनाच्या दिवशी ७.२५ कोटी रुपयांची कमाई केलेली आहे. होळीच्या दिवशी झालेल्या कमाईमुळे ह्या चित्रपटाने बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप ३ चित्रपटांमध्ये मजल मारली आहे. शाहरुख खानचा ‘जवान’ (६४०.२५) पहिल्या क्रमाकांवर तर श्रद्धा कपूरचा ‘स्त्री २’ (५९७.९९) दुसऱ्या क्रमांकावर असून विकी कौशलचा ‘छावा’ चित्रपट तिसऱ्या स्थानी आहे. ‘छावा’नं आज रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ चित्रपटाने ५५३. ८७ कोटी रुपयांचा बॉक्स ऑफिस रेकॉर्ड मोडला आणि सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या टॉप 3 यादीत स्थान मिळवलं आहे. ‘छावा’ चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित कथानक दाखवण्यात आले आहे.
२१ वर्षांनंतर अभिनेते सचिन खेडेकर पुन्हा रंगभूमीवर दिसणार, ‘या’ नाटकात दिसणार मुख्य भूमिकेत
१३० कोटींचा बजेट असलेल्या ‘छावा’चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे, तर अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत आहे. संतोष जुवेकरने रायाजी हे पात्र साकारले आहे, तर विनित सिंह कवी कलश या भूमिकेत आहे. सुव्रत जोशी, निलकांती पाटेकर, शुभांकर एकबोटे, आशुतोष राणा, सारंग साठ्ये, दिव्या दत्ता, नील भूपालम, प्रदीप राम सिंह रावत, डाएना पेंटी हे कलाकारही या चित्रपटात आहेत.