Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटातील ‘या’ संवादांवर सेन्सॉरची कात्री! चित्रपटाला कोणते मिळाले सर्टिफिकेट; जाणून घ्या

गेल्या काही दिवसांपूर्वीच ‘छावा’चित्रपटाचा रिलीज झाला होता. या ट्रेलरमधील अनेक दृश्यांनी आणि संवादांनी प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता ताणून धरली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Feb 10, 2025 | 03:04 PM
Chhaava Movie

Chhaava Movie

Follow Us
Close
Follow Us:

मराठा शासक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला देशासह जगभरात रिलीज होणार आहे. ट्रेलरमधील एका दृश्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झाला होता. त्या दृश्यामध्ये बदल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर चित्रपट प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. पण आता अशातच सेन्सॉर बोर्डाने म्हणजेच, CBFC ने ट्रेलर मधील एका संवादावर कात्री लावली आहे.

संजय दत्तच्या प्रेमापोटी चाहतीने थेट अभिनेत्याच्या नावावरच केले ७२ कोटी! वकिलाने सांगितले थक्क करणारे कारण

गेल्या काही दिवसांपूर्वीच ‘छावा’चित्रपटाचा रिलीज झाला होता. या ट्रेलरमधील अनेक दृश्यांनी आणि संवादांनी प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता ताणून धरली आहे. चित्रपटातल्या ‘फाड देंगे मुघल सल्लतनत की छाती, अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जुरत की..!’, ‘हम शोर नही करते सिधा शिकार करते है..!’ या संवादांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे, त्यातीलच काही संवादावर आता सेन्सॉरने कात्री लावली आहे. बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) ने विकी कौशल स्टारर चित्रपटाला U/A 16+ प्रमाणपत्र दिले आहे.

सलमान खानने ‘तेव्हा’ जवळून पाहिलेला मृत्यू; म्हणाला, “४५ मिनिटं विमानाच्या इंजिनाचा…”

बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, ‘छावा’चित्रपटातील डायलॉग्समध्ये काही बदल सुचवण्यात आले आहेत. ‘मुगल सल्तनत का जहर’ हा डायलॉग बदलून ‘उस समय कई शासक और सल्तनत खुद को जिंदा रखने की कोशिश कर रहे थे।’ असा डायलॉग ठेवण्यात आलाय. याशिवाय ‘खून तो आखिर मुगलों का ही है’ हा संवाद बदलण्यात आला आहे. याशिवाय ‘हरामजादा’ आणि ‘हरामजादों’ शब्दालाही म्यूट करण्यात आलंय. त्यासोबतच ‘आमीन’ शब्दाच्या ऐवजी ‘जय भवानी’ शब्दाचा वापर करण्यात आला आहे. अशाप्रकारे प्रेक्षकांना काही संवादांमध्ये बदल बघायला मिळतील. सेन्सॉरने ‘छावा’ला UA सर्टिफिकेट दिलं असून २ तास ४१ मिनिटांचा हा सिनेमा असणार आहे.

Chhava Movie Advance Booking: तिकीटबारीवर रेकॉर्ड मोडणार, इतिहास घडणार; ‘छावा’च्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात, तिकीटांचे दर किती?

चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये इतकी क्रेझ आहे की, निर्मात्यांनी ५ दिवस आधीच ॲडव्हान्स बुकिंग सुरू केले आहे. दरम्यान, चित्रपटाच्या तिकिट दराबद्दल बोलायचं झालं तर, अनेक शहरांमध्ये पहिल्या मॉर्निंग शोचं तिकिट ३०० ते ३५० च्या घरात आहे. इतर मॉर्निंग शोचं तिकिट अनेकदा स्वस्त असतं. परंतु ‘छावा’च्या पहिल्या शोचं तिकिट २०० ते ४०० च्या रेंजमध्ये आहे. तर PVR आणि INOX सारख्या थिएटर्समध्ये काही ठिकाणी हेच तिकीट ४५०-५०० रुपयांपर्यंत आहे.

चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला काल (९ फेब्रुवारी) पासून सुरुवात झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच चाहत्यांनी वेळ न दवडता आपली तिकिटे बुक केली आहेत. सध्या ऑनलाईन आणि थिएटर्सच्या तिकिटबारीवर ‘छावा’ चित्रपटावर पैशांचा पाऊस पडतोय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सॅक्निल्कच्या मते, आतापर्यंत छावाची एकूण १ हजारच्या आसपास तिकिटे विकली गेली आहेत. चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच सुमारे ३४ ते ३५ लाख रुपये कमावले आहेत. ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाल्यानंतरच्या काही तासांनंतरचीच ही परिस्थिती आहे, तर चित्रपट रिलीजच्या दिवशी काय चमत्कार करेल याची कल्पना करा. व्हॅलेंटाईन डे ला हा चित्रपट आपल्या कमाईने इतिहास रचू शकेल अशी अपेक्षा आहे.

Web Title: Chhaava gets cbfc approval after key edits dialogue changes and scene modifications

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2025 | 03:04 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.