'छावा' चित्रपट मराठा शासक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' चित्रपटाचे बजेट १३० कोटी इतके आहे. चित्रपटाची सध्या कमाई पाहता 'छावा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यासोबतच, विकी कौशलच्या कारकिर्दीत हा चित्रपट एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपट रिलीज होण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित हा ऐतिहासिक चित्रपट येत्या १४ फेब्रुवारी २०२५ रोजी संपूर्ण जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला आजपासून (९ फेब्रुवारी) सुरूवात झालेली असून चाहत्यांमध्ये याबाबत जबरदस्त उत्सुकता पाहायला मिळत आहे.
मॅडॉक फिल्म्सच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून काही तासांपूर्वी पोस्टर्स शेअर करण्यात आले आहेत. शेअर केलेल्या त्या पोस्टरमध्ये लिहिले आहे की, “छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य आणि बलिदानाची कहाणी अवघ्या काही दिवसांत मोठ्या पडद्यावर उलगडणार! ॲडव्हान्स बुकिंग वर्ल्डवाइड सुरू!” या घोषणेनंतर चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा एक हिस्टोरिकल ड्रामा असलेला चित्रपट आहे. मराठा साम्राज्याचे शासक छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित असलेल्या चित्रपटात विकी कौशलने प्रमुख भूमिका साकारली आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची उत्सुकता आहे. चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये इतकी क्रेझ आहे की, निर्मात्यांनी ५ दिवस आधीच ॲडव्हान्स बुकिंग सुरू केले आहे. दरम्यान, चित्रपटाच्या तिकिट दराबद्दल बोलायचं झालं तर, अनेक शहरांमध्ये पहिल्या मॉर्निंग शोचं तिकिट ३०० ते ३५० च्या घरात आहे. इतर मॉर्निंग शोचं तिकिट अनेकदा स्वस्त असतं. परंतु ‘छावा’च्या पहिल्या शोचं तिकिट २०० ते ४०० च्या रेंजमध्ये आहे. तर PVR आणि INOX सारख्या थिएटर्समध्ये काही ठिकाणी हेच तिकीट ४५०-५०० रुपयांपर्यंत आहे.
चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच चाहत्यांनी वेळ न दवडता आपली तिकिटे बुक केली आहेत. सध्या ऑनलाईन आणि थिएटर्सच्या तिकिटबारीवर ‘छावा’ चित्रपटावर पैशांचा पाऊस पडतोय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सॅक्निल्कच्या मते, आतापर्यंत छावाची एकूण १ हजारच्या आसपास तिकिटे विकली गेली आहेत. चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच सुमारे ३४ ते ३५ लाख रुपये कमावले आहेत. ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाल्यानंतरच्या काही तासांनंतरचीच ही परिस्थिती आहे, तर चित्रपट रिलीजच्या दिवशी काय चमत्कार करेल याची कल्पना करा. व्हॅलेंटाईन डे ला हा चित्रपट आपल्या कमाईने इतिहास रचू शकेल अशी अपेक्षा आहे.
“लग्न, घटस्फोट, चिंता अन्…”, असं काय म्हणाली करीना कपूर, बेबोची क्रिप्टिक पोस्ट हैराण करणारी
या भव्य ऐतिहासिक चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले असून, याचा साउंडट्रॅक ए. आर. रहमान यांनी संगीतबद्ध केला आहे. गाणी प्रसिद्ध गीतकार इरशाद कामिल यांनी लिहिली आहेत. ‘छावा’ हा चित्रपट सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ या ऐतिहासिक कादंबरीवर आधारित आहे. चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता विकी कौशल आणि महाराणी येसूबाईंची भूमिकेत रश्मिका मंदाना पाहायला मिळणार आहेत. तर, औरंगजेबाच्या भूमिकेत अभिनेता अक्षय खन्ना दिसणार आहे. यशराज फिल्म्सने या चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय वितरणाची जबाबदारी घेतली आहे, त्यामुळे हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांसाठी सहज उपलब्ध होणार आहे.