Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘छावा’ चित्रपटातील वादावर मराठमोळ्या अभिनेत्रीचं स्पष्ट मत; म्हणाली, “आवडलं असतं, राजाला नवीन रुपात बघायला पण,…”

दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना लेझीमचा सीन चित्रपटातून वगळण्यात येईल असं माध्यमांना सांगितलं. या मुद्द्यावर आता एका प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने पोस्ट शेअर केली.

  • By चेतन बोडके
Updated On: Jan 28, 2025 | 02:21 PM
‘छावा’ चित्रपटातील वादावर मराठमोळ्या अभिनेत्रीचं स्पष्ट मत; म्हणाली, “आवडलं असतं, राजाला नवीन रुपात बघायला पण,...”

‘छावा’ चित्रपटातील वादावर मराठमोळ्या अभिनेत्रीचं स्पष्ट मत; म्हणाली, “आवडलं असतं, राजाला नवीन रुपात बघायला पण,...”

Follow Us
Close
Follow Us:

विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला ‘छावा’चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलरही सोशल मीडियावर रिलीज झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती सुद्धा मिळाली, मात्र ट्रेलरमधील काही दृश्यांबाबत शिवप्रेमींनी नाराजी दर्शवली होती. अनेक शिवप्रेमींसह काही राजकीय नेत्यांनीही महाराज लेझीम खेळतानाच्या दृश्यावर नाराजी व्यक्त केली होती. सोमवारी चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना लेझीमचा सीन चित्रपटातून वगळण्यात येईल असं माध्यमांना सांगितलं. या मुद्द्यावर आता एका प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने पोस्ट शेअर केली आहे, तिची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

Sky Force Collection: माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाच्या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर तुफान क्रेझ, ४ दिवसांची कमाई किती?

लेझीम सीन आणि काही संवादांमुळे ‘छावा’चित्रपटाचा ट्रेलर बराच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. अनेक इतिहास जाणकारांना दाखवूनच हा चित्रपट रिलीज केला जाईल, असं मत दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी स्पष्ट केलं आहे. या वादावर आता मराठमोळी अभिनेत्री आणि बिग बॉस मराठी फेम रुचिरा जाधवने आपलं मत मांडलं आहे. ‘छावा’ चित्रपटातील सीन्सवर सुरु असलेल्या वादावर अभिनेत्रीने इन्स्टा स्टोरी शेअर करत आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.

“Ohh… मला आवडलं असतं, माझ्या राजाला नवीन रुपात बघायला, ज्यांनी स्वत:च्या कारकि‍र्दीत एवढं सगळं झेललं. त्यांना त्यांचा आनंद… ‘परंपरा जपत’ साजरं करताना बघायला नक्कीच आवडलं असतं. सिनेमा is an Art. मुळात अशी दृष्य दाखवण्यामागचा हेतू समजून न घेता, चित्रपट बघण्याआधीच निर्बुद्धपणे नकारात्मकता पसरवणं हे किती योग्य आहे? खरंतर अशा लोकांचा रादर त्यांच्या वृत्तीचा हेतू चेक केला पाहिजे.” असं रुचिराने शेअर केलेल्या इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.

‘छावा’ चित्रपटातील वादावर मराठमोळ्या अभिनेत्रीचं स्पष्ट मत; म्हणाली, “आवडलं असतं, राजाला नवीन रुपात बघायला पण,…”

‘छावा’ चित्रपटावरुन निर्माण झालेल्या कॉन्ट्रोवर्सीवर तोडगा काढण्यासाठी दिग्दर्शकांनी राज ठाकरेंची भेट घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. चित्रपटाबाबत राज ठाकरेंशी चर्चा केल्यावर माध्यमांशी संवाद साधताना लक्ष्मण उतेकर म्हणाले की, “राज ठाकरे यांचे वेगवेगळ्या विषयांमध्ये वाचन खूप आहे. विशेषत: राज ठाकरे यांनी महाराजांसंबंधित मोठ्या प्रमाणावर पुस्तकांचे वाचन केले आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत बोलत असताना मला चित्रपटात नेमके काय बदल करायला हवे, याबद्दल खूप माहिती मिळाली आहे. चित्रपटातील बदलांबद्दल मी त्यांच्याकडून माहिती घेतली असून त्यांनी मला या चर्चेतून काही सूचनाही केल्या आहेत. त्यांनी मला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले.”

आई हिंदू वडील मुस्लीम, पण देवोलिना भट्टाचार्जीने दीड महिन्याने ठेवलं मुलाचं असं नाव, आयुष्यात आणला ‘JOY’

चित्रपटातले काही सीन डिलिट होणार का? याबद्दल विचारलं असता लक्ष्मण उतेकर म्हणाले, “महाराज लेझीम खेळतानाच्या सीनवरुन सध्या वाद सुरू आहे, तो आम्ही डिलीट करणार आहोत. राज साहेबांनीही मला तोच सल्ला दिला. यामागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. पण, जर त्याच्यामुळे अप्रत्यक्षपणे कोणाच्या भावना दुखावणार असतील, तर ती दृष्य नक्की डिलीट करणार. कारण, तो सीन चित्रपटाचा मोठा भाग नाहीये… त्यामुळे तो नक्कीच डिलीट करणार. चित्रपटाची टीम यावर गेली चार वर्ष रिसर्च करतेय. हा सिनेमा बनवण्यामागचा उद्देश एकच होता की, छत्रपती संभाजी महाराज काय होते? हे संपूर्ण जगाला कळावं, ती व्यक्ती काय होती, किती प्रचंड मोठा योद्धा होता, राजा होता… हे संपूर्ण जगाला कळावं, पण एखाद, दोन गोष्टी जर त्याला गालबोट लावत असतील, तर त्या डिलीट करायला आम्हाला काही हरकत नाही.”

दरम्यान, ‘छावा’ चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये बॉलीवूड अभिनेता विकी कौशलसह दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना, अभिनेता अक्षय खन्ना असे कलाकार झळकणार आहेत. चित्रपटात सुव्रत जोशी, शुभंकर एकबोटे, संतोष जुवेकर असे मराठी कलाकार देखील झळकले आहेत.

Shruti Hasan Birthday: दारुची सवय मोडायला श्रुती हासनला लागली इतकी वर्ष, ड्रग्जबाबतही केलेलं मोठं विधान…

Web Title: Chhaava movie lezim scene controversy marathi actress ruchira jadhav shares post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2025 | 02:21 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.