Shruti Hasan Birthday: दारुची सवय मोडायला श्रुती हासनला लागली इतकी वर्ष, ड्रग्जबाबतही केलेलं मोठं विधान...
टॉलिवूडपासून ते बॉलिवूडपर्यंत आपले दमदार अभिनय कौशल्य सिद्ध करणारी अभिनेत्री श्रुती हासन शेवटची प्रभास सोबत ‘सालार’ या सुपरहिट चित्रपटात दिसली होती. कायमच आपल्या अभिनयामुळे, गाण्यामुळे आणि सौंदर्यामुळे प्रकाशझोतात राहणारी श्रुती हासन सध्या तिच्या वाढदिवसामुळे चर्चेत आहे. दरम्यान, श्रुती आज आपला ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. साऊथचे प्रख्यात अभिनेते कमल हासन यांची लाडकी लेक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रृती हासननं एका मुलाखतीमध्ये धक्कादायक खुलासा केला होता.
दरम्यान, तिने एका मुलाखतीत तिच्या दारूच्या व्यसनाबद्दल सांगितले होते, दारुचे हे व्यसन सोडण्यासाठी तिला तब्बल ८ वर्षांचा संघर्ष करावा लागला होता. श्रुती हासन मुलाखतीत म्हणाली, “गेल्या ८ वर्षांपासून मला दारुचे व्यसन होते आणि ते व्यसन सोडविण्यासाठी मला आठ वर्षे लागली. तो माझ्या आयुष्यातला फार वेगळा काळ होता. आठ वर्षापासून मी स्वत:ला खूपच कंट्रोलमध्ये ठेवत आहे. जेव्हा आपण मद्यपान करत नाही, त्यावेळी आपण पार्ट्यांमध्ये लोकांना सहन करणे कठीण असते. त्यावेळी स्वत:वर ताबा ठेवणे खूपच अवघड होते. आता मला कोणताही पश्चात्ताप नाही, हँगओव्हर नाही आणि माझ्यासाठी शांत राहणे चांगले आहे. हे एक चांगल्या आयुष्याकडे पाऊल असू शकते, किंवा तुम्हाला आयुष्यभर ते करायला नक्की आवडेल, हे खरंच चांगले आहे.”
श्रुतीने मुलाखतीत मी केव्हाच ड्रग्स घेतले नाहीत, पण नेहमी मी माझ्या जवळच्या मित्रांसोबतच दारू प्यायची, असं सांगितले होते. अभिनेत्री पुढे मुलाखतीत म्हणाली की, “मी केव्हाच ड्रग्सच्या आहारी गेले नाही, पण दारू ही माझ्या आयुष्यातील मोठी गोष्ट होती. आता आज जेव्हा मी याचा विचार करते तेव्हा मला जाणवतं की ती, माझ्यासाठी अजिबात चांगली नव्हती. मला नेहमीच चटक लागलेली असायची, मला नेहमी माझ्या मित्रांसोबत प्यावेसे वाटायचे. त्यामुळे आता मला ते माझ्या नियंत्रणात आल्यासारखे वाटते.”