आई हिंदू वडील मुस्लीम, पण देवोलिना भट्टाचार्जीने दीड महिन्याने ठेवलं मुलाचं असं नाव, आयुष्यात आणला 'JOY'
‘साथ निभाना साथिया’ फेम देवोलीना भट्टाचार्जीने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर घराघरांत प्रसिद्धी मिळवली आहे. कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी देवोलीना सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. देवोलीना गेल्या दीड महिन्यांपासून मातृत्वाचा आनंद घेत आहे. देवोलीनाने नुकतंच तिच्या मुलाचं नाव जाहीर केलं आहे. देवोलीनाने डिसेंबर महिन्यात मुलाला जन्म दिला होता. आता जवळपास दीड महिन्यांनंतर अभिनेत्रीने तिच्या मुलाचा नामकरण सोहळा पार पडला. तिने मुलाचं नाव खूपच खास ठेवलं आहे. पती शानवाज शेख आणि तिच्या लाडक्या मुलाबरोबरचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी १८ डिसेंबर २०२४ रोजी आई झाली. देवोलीनाने लग्नाच्या दोन वर्षांनी पती शानवाजसोबत पहिल्या बाळाचं स्वागत केलं. देवोलीना आणि शानवाज यांचं आंतरधर्मीय लग्न होतं. या जोडप्याने बाळाचं नाव हटके ठेवलं आहे. देवोलीना भट्टाचार्जीने मुलाचा फोटो शेअर करत बाळाचे नावही सांगितले. देवोलीनाने शानवाज शेखसोबत कोर्ट मॅरेज केले होते. इन्स्टाग्रामवर शानवाज आणि मुलासोबतचा फोटो शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले की, “आम्ही आमच्या कुटुंबातील सर्वात नवीन सदस्याचं स्वागत करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आमचा जॉय, बंडल ऑफ हॅप्पीनेस!” असं कॅप्शन देवोलीनाने दिलं आहे.
शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये देवोलीना आपल्या बाळाला कुशीत घेऊन बसलेली दिसत आहे, तर शेजारी तिचा पती शानवाज बसलेला दिसत आहे. तर, दुसऱ्या फोटोत फक्त देवोलीना आणि तिचं बाळ बसलेलं दिसत आहे. देवोलीनाने दोन्ही फोटोत रेड हार्ट इमोजी वापरून बाळाचा चेहरा लपवला आहे. अभिनेत्रीने बाळाचं नाव ठेवलेल्या युनिकनेसची सध्या जोरदार चर्चा होत आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टवर, चाहते आणि सेलिब्रिटींकडून कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. देवोलिना आणि शहनवाजने त्यांच्या मुलाचं नाव ‘जॉय’ असं ठेवलं आहे. ‘जॉय’ नावाचा अर्थ आनंद किंवा खुशी असा होतो.
अरुंधती पुन्हा येतेय; ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार, सेटवरील Photos Viral
दरम्यान, देवोलीना भट्टाचार्जी आणि जिम ट्रेनर शानवाज शेख काही वर्षे रिलेशनशिपमध्ये होते, त्यानंतर या दोघांनी १४ डिसेंबर २०२२ रोजी लग्न केलं. त्यांनी नोंदणी पद्धतीने लोणावळ्यात लग्न केलं होतं. या लग्नात दोघांचे कुटुंबीय व काही जवळचे लोक उपस्थित होते. लग्नानंतर दीड वर्षांनी या दोघांनी ते आई-बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी दिली होती. त्यानंतर डिसेंबर २०२४ मध्ये त्यांच्या मुलाचा जन्म झाला.