‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज - भाग १’ चित्रपटातील औरंगजेबाच्या छाताडावर लाथ मारून हिंदुत्वाला मिठी मारणारा सीन व्हायरल!
संदीप रघुनाथ मोहिते-पाटील प्रस्तुत आणि उर्विता प्रोडक्शन निर्मित बहुचर्चित, महाराष्ट्राचा महासिनेमा ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ चित्रपट २२ नोव्हेंबर २०२४ ला रिलीज झाला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या अद्वितीय शौर्याचा आणि त्यागाचा सन्मान करणारा आहे. हा चित्रपट म्हणजे महाराष्ट्राचा महासिनेमा आहे.
‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज – भाग १’ चित्रपटातील एक सीन सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. औरंगजेबाच्या जुलमी सत्तेला आव्हान देत, छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या छाताडावर लाथ मारून हिंदुत्वाला मिठी मारली. हा सीन सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या सीनच्या व्हिडिओसला प्रेक्षक चांगला प्रतिसाद देत आहेत. महाराजांवर प्रेम करणाऱ्या शिवभक्तांनी हा सीन आणि चित्रपट डोक्यावर उचलला आहे. महाराष्ट्रभरात हा चित्रपट चांगलाच गाजत असून चित्रपटावर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत.
अल्लू अर्जुन आणि श्रीलीलाच्या ‘पुष्पा २’मधल्या ‘किस्सीक’ गाण्याचा अर्थ काय ? वाचा सविस्तर
थोडक्यात चित्रपटाबद्दल सांगायचे तर, छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांना चित्रपटामध्ये भव्यदिव्य स्वरूपात मांडण्यात आले आहे. त्यांच्या शौर्यपूर्ण नेतृत्वाने हिंदवी स्वराज्याचे संरक्षण केले, तसेच धर्माच्या रक्षणासाठी दिलेल्या बलिदानाचे अत्यंत प्रभावी चित्रण करण्यात आले आहे. छत्रपती संभाजी महाराजांची ही शौर्यगाथा चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवयाला मिळणार आहे.
चित्रपटात प्रमुख भूमिकेत ठाकूर अनुप सिंग, अमृता खानविलकर, किशोरी शहाणे, भार्गवी चिरमुले, मल्हार मोहिते-पाटील, संजय खापरे, पल्लवी वैद्य, कमलेश सावंत, विनीत शर्मा, प्रदीप रावत, प्रदीप कब्रा, राज जुत्शी अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. संदीप रघुनाथ मोहिते-पाटील प्रस्तुत, आणि उर्विता प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाची निर्मिती शेखर रघुनाथराव मोहिते-पाटील, धर्मेंद्र सुभाष बोरा, सौजन्य सूर्यकांत निकम आणि केतनराजे निलेशराव भोसले यांनी केली आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार विजयराव शेलार यांनी केले आहे.
सुजय डहाकेच्या ‘तुझ्या आयला’चे पोस्टर इफ्फीमध्ये लाँच