अल्लू अर्जुन आणि श्रीलीलाच्या ‘पुष्पा २’मधल्या ‘किस्सीक’ गाण्याचा अर्थ काय ? वाचा सविस्तर
सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा २ द रूल’ चित्रपटाची सध्या प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. चित्रपट येत्या ५ डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल तुफान क्रेझ पाहायला मिळत आहे. चित्रपटाचा आतापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला मोशन पोस्टर्स, टीझर, २ गाणी आणि ट्रेलर आला आहे. आता या नंतर प्रेक्षकांच्या भेटीला तिसरं गाणं आलं आहे. हे नवं आयटम साँग असून ह्या गाण्याचं नाव ‘किस्सीक’ असं आहे. या गाण्यामध्ये मुख्य भूमिकेत अल्लू अर्जुन आणि श्रीलीला आहे.
सुजय डहाकेच्या ‘तुझ्या आयला’चे पोस्टर इफ्फीमध्ये लाँच
२४ नोव्हेंबरला अर्थात आज हे गाणं सोशल मीडियावर रिलीज झालेलं आहे. आज चेन्नईमध्ये निर्मात्यांनी एका ग्रँड म्युझिक इव्हेंटचं आयोजन केलं होतं. या म्युझिक इव्हेंटमध्ये चित्रपटातलं ज्युक ऑडिओ, ‘किस्सीक’ गाणं आणि आधी रिलीज झालेले गाणेही प्रेक्षकांना दाखवण्यात आले होते. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि श्रीलीला यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली. खरंतर, ‘किस्सीक’ गाण्याची व्हिडिओ निर्मात्यांनी रिलीज केलेली नाही. आज अर्थात २४ नोव्हेंबरला ‘किस्सीक’ गाणं हे निर्मात्यांनी लिरिकल व्हर्जनमध्ये रिलीज केलं आहे.
म्युझिक लाँचिंग इव्हेंटमध्ये ‘किस्सीक’ गाण्याचा अर्थ सेलिब्रिटींनी सांगितला. ‘किस्सीक’ गाण्याचा अर्थ ‘फोटो घ्या…’ असे आहेत. त्याआधारेच या गाण्याला ‘किस्सीक’ असे नाव देण्यात आले आहे. वास्तविक, जेव्हा हे गाणे सुरू होते, तेव्हा अल्लू अर्जुन म्हणतो, “आ गए ना सब पार्टी में. अब खींच रे फोटो किसिक करके.” वास्तविक, फोन किंवा कॅमेऱ्यावर फोटो क्लिक केल्यावर येणारा ‘किस्सीक’ असा आवाज हे या गाण्याचे शीर्षक आहे. जरी ही हे गाणं लिरिकल व्हर्जनमध्ये रिलीज झालं असलं तरी, व्हिडिओच्या शेवटी निर्मात्यांनी त्यात बीटीएस व्हिडिओची झलक दाखवली आहे. मात्र, याआधी निर्मात्यांनी चित्रपटातील दोन गाणे रिलीज केले होते, जे लोकांना खूप आवडले होते.
‘पुष्पा- पुष्पा- पुष्पा’ हे टायटल साँग आणि ‘सोसेकी’ असे दोन गाणे एप्रिल महिन्यात सोशल मीडियावर रिलीज झालेले आहेत. त्या गाण्यांना प्रेक्षकांनी दमदार प्रतिसाद दिला होता. त्या गाण्यांची सोशल मीडियावर तुफान क्रेझ पाहायला मिळाली होती. आता त्या गाण्याप्रमाणेच ‘किस्सीक’ गाण्यालाही प्रेक्षक प्रतिसाद देणार का हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे. चित्रपटामध्ये पुष्पा रक्त चंदनाच्या झाडांची तस्करी करणारा तस्कर दाखवण्यात आला आहे. त्याची ही तस्करी फक्त देशापुरतीच मर्यादित राहिलेली दिसत नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्याची तस्करी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पुष्पाच्या स्टाईलने, त्याच्या लूकने आणि त्याच्या डायलॉगने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.
वरूण धवनचा ‘बेबी जॉन’ आहे 8 वर्ष जुन्या Theri चा रिमेक, कथेपासून ट्रेलरपर्यंत सर्वकाही
पुष्पा आणि श्रीवल्लीच्या लव्हस्टोरीने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. अल्लू अर्जुन स्टारर ‘पुष्पा २: द रूल’ चित्रपट रिलीज झाल्यानंतरच प्रेक्षकांना अनेक अनुत्तरित प्रश्नांचे उत्तरं मिळतील. ‘पुष्पा २’ चित्रपट येत्या ५ नोव्हेंबर २०२४ ला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.. ५०० कोटींच्या बजेटमध्ये चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. भारतातील बिग बजेट चित्रपटांमध्ये ‘पुष्पा २’चा समावेश करण्यात आला आहे. ‘पुष्पा’प्रमाणेच ‘पुष्पा २’हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड करेल, यामध्ये शंका नाही. अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदानाही स्क्रीन शेअर करणार आहे. तर फहद फासिल खलनायकाच्या भूमिकेत दिसेल.