"मुलगी नको, मुलगा पाहिजे.., " वारसा गमावण्याच्या भीतीपोटी मेगास्टार चिरंजीवी यांची मुलाकडे मागणी
अभिनेता चिरंजीवी हे टॉलिवूड इंडस्ट्रीतील मोठं नाव आहे. गेली कित्येक दशकं प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणारे चिंरजीवी सध्या एका विधानामुळे चर्चेत आले आहेत. चिरंजीवी यांनी कुटुंबाचा वारसा पुढे नेण्यासाठी नातू हवा असल्याचं वक्तव्य केलं असून त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगलीये. अभिनेत्याला त्याच्या वक्तव्यामुळे सध्या सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. ‘ब्रह्म आनंदम’ चित्रपटाच्या प्री रिलीज इव्हेंटमध्ये चिरंजीवींनी हे धक्कादायक वक्तव्य केलं आहे.
Chhaava Advance Booking: ‘छावा’ चित्रपटाची यूपीत वाईट अवस्था, महाराष्ट्रात विकली गेली एवढी तिकिटे!
कुटुंबाचा वारसा पुढे नेण्यासाठी नातू व्हावा, अशी इच्छा अभिनेता चिरंजीवी यांनी व्यक्त केली आहे. तसेच राम चरणला पुन्हा मुलगी होईल, अशी भीतीही चिरंजीवी यांना वाटते, असंही ते यावेळी म्हणाले. त्यांनी केलेल्या लिंगभेदाच्या वक्तव्यावरुन त्यांना सोशल मीडियावर तुफान ट्रोल केलं जात आहे. नेटकरी त्यांच्यावर मुलगा आणि मुलगीमध्ये भेदभाव करण्याचा आरोप करीत आहेत. ‘ब्रह्म आनंदम’ कार्यक्रमात चिरंजीवी म्हणाले की, “मी जेव्हा घरी असतो, तेव्हा मला वाटतं की, मी महिला हॉस्टेलचा वॉर्डन आहे की काय. मी घरी नातींच्याच घोळक्यात बसलेलो असतो. माझ्या आजुबाजुला सर्व मुलीच असतात, म्हणून मी रामचरणला बोलतोय की, एक तरी मुलगा होऊदे.”
‘रांझा तेरा हीरिये…’ व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल रोमँटिक गाणं रिलीज, सोशल मीडियावर जबरदस्त क्रेझ
“जेणेकरुन आपल्या कुटुंबाचा वारसा तरीही पुढे जाईल. पण, त्याची मुलगी त्याचा जीव की प्राण आहे. त्याला पुन्हा मुलगीच होईल अशी मला भीती वाटते, असं चिरंजीवी हसत हसत त्या कार्यक्रमात म्हणाले आहेत.” राम चरण हा चिरंजीवी यांचा सर्वात लहान मुलगा आहे. राम चरणला दोन मोठ्या बहिणी आहेत. त्यांचं नाव श्रीजा आणि सुष्मिता आहे. चिरंजीवी यांची मोठी मुलगी सुष्मिताला हिला समारा आणि संहिता अशा दोन मुली आहेत. श्रीजाचे पहिले लग्न शिरीष भारद्वाजशी झाले होते, त्यांना निवृत्ती नावाची एक मुलगी आहे आणि ती श्रीजासोबत राहते. श्रीजाने अभिनेता कल्याण रावशी दुसरे लग्न केले आणि त्यांच्या मुलीचे नाव नविश्का आहे. २ वर्षांपूर्वी राम चरणची पत्नी उपासना हिनेही एका मुलीला जन्म दिला. राम चरण आणि उपासनाला लग्नानंतर १२ वर्षांनी कन्यारत्न प्राप्ती झाली. राम चरणच्या लेकीचं नाव क्लिन कारा कोनिडेला असं आहे.
चिरंजीवींच्या या वादग्रस्त विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर नेटकरी त्यांना ट्रोल करत आहेत. दरम्यान, मेगास्टार चिरंजीवी यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ते लवकरच ‘विश्वंभरा’ या सिनेमात झळकणार आहेत.