Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आनंदीच्या विळख्यातून इंदूला बाहेर कसं काढणार विठुराया ? आनंदीचा खरा चेहरा इंदूच्या समोर येईल ?

व्यंकू महाराज आणि गावकऱ्यांच्या आग्रहाखातर इंदूचा बाल कीर्तनकार बनण्याचा प्रवास सुरु झाला. ज्यात व्यंकू महाराजांच्या उपस्थित इंदू पहिल्यांदाच एकटी कीर्तन करताना दिसली. हे सगळं घडत असताना आनंदीने खेळी रचायला सुरुवात केली.

  • By चेतन बोडके
Updated On: Jan 03, 2025 | 05:02 PM
आनंदीच्या विळख्यातून इंदूला बाहेर कसं काढणार विठुराया ? आनंदीचा खरा चेहरा इंदूच्या समोर येईल ?

आनंदीच्या विळख्यातून इंदूला बाहेर कसं काढणार विठुराया ? आनंदीचा खरा चेहरा इंदूच्या समोर येईल ?

Follow Us
Close
Follow Us:

कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेत बऱ्याच घटना घडल्या. गावावरचं भूताचं संकट इंदू आणि फंट्या गँग मिळून अत्यंत नाट्यमय पद्धतीने सर्वांसमोर आणले. गावावर आलेलं अंधश्रद्धेचं मोठं वादळ दूर केल्याने सर्वत्र इंदूचं भरभरून कौतुक झाले. इंदूने सत्याची साथ कधी सोडली नाही आणि गावावरचं जे संकट होतं ते दूर केले ज्यामुळे व्यंकू महाराज आणि गावकऱ्यांच्या आग्रहाखातर इंदूचा बाल कीर्तनकार बनण्याचा प्रवास सुरु झाला. ज्यामध्ये व्यंकू महाराजांच्या उपस्थित इंदूने पहिल्यांदाच एकटी विशेष कीर्तन करताना दिसून आली. हे सगळं घडत असतानाच आनंदीबाईंनी त्यांची वेगळी खेळी रचायला सुरुवात केली.

गौतमी पाटीलचं लवकरच आयटम साँग येणार, गाण्याची शूटिंगही पूर्ण

इंदूचा आजवर दु:स्वास करणारी, विरोध करणारी आनंदीबाई अचानक इंदूच्या बाजूने उभी राहते हे जरा खटकणारेच वाटले. इंदूला कीर्तनकार बनविण्यामागचा आनंदीबाईंचा हेतू काही वेगळाच आहे, हे व्यंकू महाराजांना कळेल ? आनंदीबाईंचा खरा चेहरा इंदूच्या समोर येईल ? आनंदीबाईंच्या या अचानक झालेल्या बदला मागचे नक्की कारण त्यांना कळेल ? स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी आणि पैश्याच्या हव्यासापोटी आनंदीबाई इंदूचा वापर करत आहेत. आनंदीच्या विळख्यातून इंदूला विठुराया कसा बाहेर काढणार… तिचा पाठीराखा तिला कसा वाचवणार ? हे बघणे रंजक असणार आहे. पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी बघत राहा पहा इंद्रायणी दररोज संध्या. ७. ०० वा. आपल्या कलर्स मराठीवर !

अभिनेते अभिताभ बच्चन यांचा देशाच्या ‘महानायक’ यांच्या निधनावर शोक; म्हणाले ‘स्वर्गातले आमचे नायक…’

याबद्दल बोलताना आनंदीबाईची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनिता दाते म्हणाली, “मालिकेचा प्रोमो नुकताच समोर आला आहे. येत्या ट्रॅकमुळे मालिकेला एक वेगळीच कलाटणी मिळणार आहे हे निश्चित. आजवर आनंदीबाई इंदूच्या कायम विरोधातच होती… हि मुलगी आपल्या आसपास नको, घरातच नको असं म्हणत आली आहे. इंदूने आजवर हे सगळे सहन देखील केले आहे. यासगळ्या परिस्थितीमध्ये इंदू व्यंकू महाराजांकडून कीर्तन देखील शिकते. आनंदीबाईने इंदूची माफी मागणे, संपूर्ण गावामध्ये बोलबाला झाला आहे ज्यामध्ये सगळ्यांना इंदूचे कीर्तन ऐकण्याची उत्सुकता निर्माण होते ज्याचा आनंदीला खूप त्रास होतो आहे. पण या गोष्टीचा फायदा आता आनंदीबाई घेणार आहे. इंद्रायणी बरोबर आनंदीबाई आता चांगलं वागणार आहे. या नवीन ट्रॅकसाठी आमच्या टीमने एक वेगळा विचार केला आहे. आनंदीबाई आतापर्यंत ज्यापद्धतीने दिसत होती ती तशी न दिसता आनंदीचे एक वेगळे रूप प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. कदाचित ते फसवं आहे पण याक्षणी इंद्रायणीच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी ते तिला योग्य वाटते आहे . यासाठी आमच्या डिझानयरने वेगळ्या पद्धतीच्या साड्या दिल्या आहेत ज्यामध्ये ती सात्विक दिसेल, अतिशय साधा लूक असणार आहे. यासगळ्या दरम्यान आंनदी इंदूच्या मनात विश्वास निर्माण करणार आहे कि, ती जो विचार करते आहे इंदूसाठी तो तिच्या भल्यासाठी आहे. आजवर इंदूला कधीही न मिळालेलं प्रेम आनंदीकडून मिळणार आहे. या नव्या ट्रॅकसाठी मी खूपच उत्सुक आहे. या पुढचे भाग अधिकाधिक रंजक असणार आहेत आणि प्रेक्षकांना ते आवडतील अशी माझी आशा आहे.”

“…ते तुझ्या संघर्षाचे फळ आहे”, अभिनेता किरण मानेंची क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंसाठी खास पोस्ट

आनंदीबाईंचे संशयास्पद वागणे, इंदूबाबतची आनंदीबाईंची अचानक वाढलेली माया बघून अंताजीने आनंदीबाईंना बजावले देखील खेळी चुकली तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. नेहेमीच सत्याच्या बाजूने उभे राहणारे व्यंकू महाराज मालिकेमध्ये इंदूच्या भल्यासाठी तिच्या विरोधात गेले तर दुसरीकडे पहिल्यांदाच आनंदीबाईंनी इंदूची साथ दिली. आनंदीबाई इंदूच्या बाजूने का बोलत आहेत यामागील सत्य इंदूला उमजेल का ? आनंदीबाई व्यंकू महाराजांच्या विरोधात आहेतच पण पुढे जाऊन इंदू व्यंकू महाराजांच्या विरोधात जाईल ? वा आनंदीबाई इंदूला व्यंकू महाराजांच्या विरोधात जाण्यास भाग पाडतील ? इंदू खऱ्या – खोट्याची परीक्षा करू शकेल ? हे सगळेच बघणे खूपच उत्सुकतेचे असणार आहे. कारण यामुळेच मालिकेला एक वेगळीच कलाटणी मिळणार आहे.

Web Title: Colors marathi in indrayani serial latest episode news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2025 | 05:02 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.