गौतमी पाटीलचं लवकरच आयटम साँग येणार, गाण्याची शूटिंगही पूर्ण
प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील, अभिनेता डॉ. महेश कुमार आणि गणेश दिवेकर यांच्या एका आयटम साँगचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. ‘वामा- लढाई सन्मानाची’ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सध्या उज्जैनमध्ये सुरू आहे.
अभिनेते अभिताभ बच्चन यांचा देशाच्या ‘महानायक’ यांच्या निधनावर शोक; म्हणाले ‘स्वर्गातले आमचे नायक…’
तिच्या दिलखेचक अदाकारीने आणि लावणीमुळे ओळखल्या जाणाऱ्या गौतमीने असंख्य म्युझिक व्हिडिओसाठी डान्स केला आहे. तिच्या अनेक डान्सची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली आहे. येत्या आगामी चित्रपटातून एका खास गाण्यातून गौतमी पुन्हा एकदा प्रेक्षकांना थिरकायला सज्ज झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतमीचं हे गाणं हिट डान्स नंबर बनण्यासाठी तयार आहे, जे विवाहसोहळा आणि उत्सवांसाठी योग्य आहे. गौतमीची लक्षवेधी उपस्थिती आणि नृत्यदिग्दर्शन यामुळे ती चाहत्यांची आवडती ठरेल अशी अपेक्षा आहे. या गाण्यात मराठी अभिनेता डॉ. महेश कुमार आणि गणेश दिवेकर यांच्याही भूमिका आहेत. या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन सुधाकर माझी यांनी केले आहे. सुचिर कुलकर्णीने संगीतबद्ध केलेले आणि प्रतिभावान गायिका वैशाली सामंतने जिवंत केलेले हे संगीत कायमस्वरूपी छाप सोडण्याचे वचन देते.
“…ते तुझ्या संघर्षाचे फळ आहे”, अभिनेता किरण मानेंची क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंसाठी खास पोस्ट
‘वामा – लढाई सन्मानाची’ च्या मुख्य कलाकारांमध्ये काश्मिरा जी. कुलकर्णी, महेश वान्वे, जुई बी आणि इतरांचा समावेश आहे. अशोक आर. कोंडके लिखित, दिग्दर्शित आणि संकल्पित या चित्रपटाची निर्मिती ओंकारेश्वर प्रॉडक्शनच्या बॅनरखाली सुब्रमण्यम के. यांनी केली आहे. धीरज काटकाडे यांचे छायाचित्रण, तरंग वैद्य यांचे संवाद आणि रवी कोंडके यांचे कला दिग्दर्शन आहे.प्रकाश झा यांनी या चित्रपटाचे संपादन केले आहे. अॅक्शन दृश्यांचे समन्वय स्टंट दिग्दर्शक रॉबर्ट जॉन फॉन्सेका यांनी केले असून वेशभूषेची रचना नदीम बक्षी यांनी केली आहे. महिला सक्षमीकरणावर एक शक्तिशाली संदेश देणे हा या चित्रपटाचा उद्देश आहे. हे लैंगिक समानतेच्या आदर्शांमधील अंतर आणि प्रत्यक्षात महिलांना भेडसावणारी आव्हाने अधोरेखित करते.