टिव्हीवरील गोपी बहू अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी (devoleena bhattacharjee) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतचं तिने केरला स्टोरी (the kerala story ) सिनेमा पाहायला गेल्याच सोशल मिडियावर सांगितले होते. यानंतर एका व्यक्तीने तिला टार्गेट करण्यात आलं असून तिचं लग्न ‘लव्ह जिहाद’शी (love jihad) जोडलं. यावर आता अभिनेत्रीनेही चोख प्रत्युत्तर दिले असून पती शाहनवाजला खरा भारतीय मुस्लिम म्हटले आहे.
हरिद्वार येथील उजव्या विचारसरणीच्या नेत्या साध्वी प्राची यांनी उत्तराखंडमधील ‘द केरळ स्टोरी’च्या स्क्रीनिंगमधील फोटो शेअर केल्यावर हा राडा सुरू झाला. त्यांनी लिहिले, ‘द केरळ स्टोरी’ हरिद्वारमध्ये मुलींना मोफत दाखवण्यात आली. या पोस्टच्या कंमेट सेक्शनमध्ये कोणीतरी देवोलिना भट्टाचार्जीबद्दल बोलले आणि त्यांचे पती शाहनवाज शेख यांचा उल्लेख केला. ‘लव्ह जिहाद असाच असतो.’ अंस एका युजरने म्हण्टले होते. त्यावरुन बराच वादंग झाला.
[read_also content=”घराच्या दरवाजावर स्वस्तिक बनवणं भारतीयाला पडलं महागात; थेट तुरुंगाची खावी लागली हवा, सौदी अरेबियातला अजब प्रकार! https://www.navarashtra.com/crime/engineer-from-andhra-pradesh-jailed-for-making-swastik-symbol-on-door-of-home-in-saudi-arabia-nrps-401863.html”]
यावर उत्तर देताना देवोलिना भट्टाचार्जीने ट्विट केले की, ‘अरे खान साब, मला फोन करण्याची गरज नाही. केरळ स्टोरी पाहिल्यानंतर मी आणि माझे पती आधीच आलो होतो आणि आम्हा दोघांनाही ती खूप आवडली. तुम्ही खरे भारतीय मुस्लिम हे नाव ऐकले आहे का? चुकीला चुकीचे म्हणण्याची ताकद आणि हिंमत दोन्ही ज्यांच्याकडे आहे, त्यांच्यापैकी माझे पती आहेत.
Arey Khan saab mujhe bulaane ko zaroorat nahi padhi.Main aur mere husband pehle hi dekh kar agaye the The Kerela Story aur bohot hi acchi lagi hum dono ko hi.TRUE INDIAN MUSLIM naam suna hai kya ?Mere pati unme se hi hai jo galat ko galat kehne ki taqat aur himmat dono rakhte hai https://t.co/PuJD3F92or
— Devoleena Bhattacharjee (@Devoleena_23) May 19, 2023
देवोलीनाने एका पोस्टला उत्तर दिले होते ज्यात एका महिलेची कथा सांगितली होती जिने केरळ स्टोरी पाहिल्यानंतर कथितपणे तिच्या प्रियकराशी ब्रेकअप केले होते. या अभिनेत्रीने चित्रपटाच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे. या चित्रपटाबद्दल त्यांनी आपले विचार मांडले आणि म्हणाले, ‘हे नेहमीच असे नसते. माझे पती मुस्लीम आहेत आणि माझ्यासोबत चित्रपट पाहायला आले आणि त्यांनी त्याचे कौतुक केले. त्याने तो गुन्हा म्हणून घेतला नाही किंवा तो आपल्या धर्माविरुद्ध आहे असे त्याला वाटले नाही. आणि मला वाटतं प्रत्येक भारतीय असा असावा. त्याने ‘द केरळ स्टोरी’ हा हॅशटॅगही वापरला.