Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तेजस्विनी पंडितचा ‘येक नंबर’ चित्रपट आता ओटीटीवर येणार; कधी आणि कुठे होणार रिलीज…

धैर्य घोलप आणि सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'येक नंबर' चित्रपट लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Nov 06, 2024 | 07:35 PM
तेजस्विनी पंडितचा ‘येक नंबर’ चित्रपट आता ओटीटीवर येणार; कधी आणि कुठे होणार रिलीज...

तेजस्विनी पंडितचा ‘येक नंबर’ चित्रपट आता ओटीटीवर येणार; कधी आणि कुठे होणार रिलीज...

Follow Us
Close
Follow Us:

धैर्य घोलप आणि सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘येक नंबर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश मापुस्कर यांनी केले आहे आणि निर्मिती तेजस्विनी पंडित व वरदा नाडियादवाला यांनी केली आहे.

ZEE5 हा भारतात स्थापन झालेला सर्वात मोठा व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आणि बहुभाषिक कथाकथनकार असून ८ नोव्हेंबर रोजी ‘येक नंबर’ या अलिकडेच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमिअर करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. राजेश मापुस्कर या व्हिजनरी दिग्दर्शकाने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. प्रेम व राजकीय महत्त्वाकांक्षेचे कथानक असलेल्या या चित्रपटात धैर्य घोलप व सायली पाटील यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. झी स्टुडिओज, नाडियादवाला ग्रँडसन्स एंटरटेनमेंट व सह्याद्री फिल्म्स या बॅनरअंतर्गत तेजस्विनी पंडित व वरदा नाडियादवाला यांची ही निर्मिती असून ‘येक नंबर’मध्ये रोमान्स, नाट्य, राजकीय उत्कंठावर्धक घडामोडी आणि थरार यांची सांगड घातलेली आहे.

हे देखील वाचा – बॉलिवूड अभिनेत्रीने अमेरिकेच्या निवडणुकीत केले मतदान, पोस्ट करत ट्रम्प यांच्या विजयावर व्यक्त केली नाराजी

ही कथा सधनपूरच्या प्रतापभोवती फिरते. तो गावातील एक उमदा आणि राजकारणात करिअर घडवण्याचा प्रयत्न करणारा तरुण आहे. पिंकी या आपल्या बालमैत्रिणीचे मन जिंकण्याचा तो प्रयत्न करत असतो. पिंकी राज ठाकरे यांची चाहती आहे आणि त्यांच्या विचारांचा तिच्यावर मोठा पगडा आहे. “तुझे माझ्यावर प्रेम असेल तर तू राज साहेबांना गावात आण.”, अशी गळ पिंकी प्रतापला घालते. आपले प्रेम साध्य करण्यासाठी प्रताप हे अशक्यकोटीतील आव्हान स्वीकारतो आणि अनपेक्षितपणे तो राज साहेबांशी संबंधित एका हत्येच्या कटात गोवला जातो. स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी प्रतापला योग्य-अयोग्याच्या गढूळ पाण्यातून मार्ग काढावा लागतो आणि या प्रवासात धक्कादायक वळणांनी भरलेली एक थरारक कथा उलगडत जाते.

‘येक नंबर’ हे एक खिळवून ठेवणारे कथानक आहे आणि यात राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रेम व राजकारणाचे नाट्य गुंफलेले आहे. या चित्रपटात ग्रामीण भागातील रांगडेपणा आणि शहरातील आव्हाने यांची सांगड घालून या चित्रपटात प्रेम, महत्त्वाकांक्षा, राजकीय विचारधारा या भावनांचा शोध घेण्यात आला आहे आणि त्यामुळेच हा चित्रपट मनोरंजन करण्यासोबतच विचार करायलाही भाग पाडतो.

 

ZEE5चे चीफ बिझनेस ऑफिसर मनिष कालरा म्हणाले, “आमच्या मराठी पोर्टफोलिओमध्ये ‘‘येक नंबर’’ या चित्रपटाची भर घालताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. प्रेम व राजकीय नाट्य यांची या चित्रपटात उत्तम प्रकारे सांगड घातली आहे. ‘धर्मवीर २’ या चित्रपटानंतर आमच्या मराठी कंटेन्टमध्ये ही उत्तम कलाकृती समाविष्ट झाली आहे. यातून, विविध प्रकारची कथानके सादर करण्याप्रती असलेली आमची प्रतिबद्धता दिसून येते. स्थानिक कथांमध्ये असलेल्या ताकदीवर आमचा विश्वास आहे आणि ‘येक नंबर’ हा चित्रपट या व्हिजनशी पूर्णपणे सुसंगत आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडविणारा आणि प्रेक्षकांना उत्तम कथानकांच्या माध्यमातून खिळवून ठेवणारा कंटेन्ट सादर करण्यास आम्ही उत्सुक आहोत.”

हे देखील वाचा – “त्या व्यक्तीने गोळी लागलेली असतानाही उठून…” कंगना रणौतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी लिहिली खास पोस्ट

‘येक नंबर’ चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश मापुस्कर म्हणाले, “‘येक नंबर’ हा माझ्यासाठी अत्यंत समाधानकारक प्रवास होता. या चित्रपटात प्रेम आणि राजकीय महत्त्वाकांक्षा या दोन भावना गुंफल्या आहेत. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता ZEE5च्या माध्यमातून हा चित्रपट अजून प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, याचा मला अत्यंत आनंद आहे. या प्लॅटफॉर्ममुळे प्रेक्षकांना घरी बसून आमच्या चित्रपटाचा आनंद घेता येईल. ‘येक नंबर’च्या डिजिटल प्रदर्शनासाठी मी अत्यंत उत्सुक आहे आणि हा चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या आयुष्यातील प्रेम व विचारधारा यावर अर्थपूर्ण चर्चा घडेल.”

हे देखील वाचा – “हार गये तो क्या ? जीतते रहे तो…” ; अमिताभ बच्चन यांनी लिहिलेली क्रिप्टिक पोस्ट तुफान व्हायरल

‘येक नंबर’ चित्रपटाच्या निर्मात्या तेजस्विनी पंडित म्हणाल्या, “आम्हाला ही प्रभावी कथा अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ZEE5 सोबत भागीदारी करताना आनंद होत आहे. ‘येक नंबर’मध्ये लाखो प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालण्याची क्षमता आहे आणि इतके गुणवान कलाकार आणि राजेश मापुस्कर या दूरदृष्टी असलेल्या दिग्दर्शकासोबत काम करणे हा एक उत्तम अनुभव होता. या चित्रपटाचे चित्रपटगृहातील प्रदर्शन ही केवळ सुरुवात आहे. आम्ही पुढील प्रवासाबाबत आशावादी आहोत आणि ZEE5 च्या माध्यमातून ही अप्रतिम कथा अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उत्सुक आहोत.

Web Title: Dhairya gholap and sayali patil starrer yek number marathi movie released on ott see news where and when watch this movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2024 | 07:35 PM

Topics:  

  • tejaswini pandit

संबंधित बातम्या

Tejaswini Pandit: आई काय बोलू…अजून sink in होत नाहीये गं, तेजस्विनी पंडितने आईच्या निधनानंतर तब्बल १६ दिवसांनी केली भावुक पोस्ट
1

Tejaswini Pandit: आई काय बोलू…अजून sink in होत नाहीये गं, तेजस्विनी पंडितने आईच्या निधनानंतर तब्बल १६ दिवसांनी केली भावुक पोस्ट

Jyoti Chandekar funeral: आईला शेवटचा निरोप देताना भावुक झाली तेजस्विनी, मुखाग्नी देताना ढसाढसा रडली
2

Jyoti Chandekar funeral: आईला शेवटचा निरोप देताना भावुक झाली तेजस्विनी, मुखाग्नी देताना ढसाढसा रडली

Jyoti Chanderkar: कधी आणि कुठे होणार ज्योती चांदेरकर यांचे अंत्यसंस्कार? मुलगी तेजस्विनी पंडितने दिली माहिती
3

Jyoti Chanderkar: कधी आणि कुठे होणार ज्योती चांदेरकर यांचे अंत्यसंस्कार? मुलगी तेजस्विनी पंडितने दिली माहिती

Jyoti Chandekar Passes Away: ‘ठरलं तर मग’फेम ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकरांचे निधन, पुण्यात अखेरचा श्वास
4

Jyoti Chandekar Passes Away: ‘ठरलं तर मग’फेम ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकरांचे निधन, पुण्यात अखेरचा श्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.