"त्या व्यक्तीने गोळी लागलेली असतानाही उठून..." कंगना रणौतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी लिहिली खास पोस्ट
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. यासाठी मंगळवारी (५ नोव्हेंबर) मतदान झाले होते. या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस आणि माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात प्रामुख्याने लढत पाहिला मिळाली. आता या निवडणुकीचे निकाल समोर आले असून, डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकदा विजयी झाले आहेत. त्यामुळे आता ते दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले असून, त्यांनी कमला हॅरिस यांचा पराभव केला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर भाजपा खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिने डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो शेअर करत त्यांच्या खास इन्स्टा स्टोरी शेअर केलेली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून या निवडणूकीची जोरदार चर्चा सुरू आहे. अख्ख्या जगाचं लक्ष लागून राहिलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत 277 इलेक्टोरल मतं मिळाली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या कमला हॅरिस यांना 226 इलेक्टोरल मतं मिळाली आहेत. दोघांचेही मतं पाहिल्यास सर्वाधिक मतं डोनाल्ड ट्रम्प यांनाच मिळालेली असून त्यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे. काही तासांपूर्वीच अभिनेत्री कंगना रणौत हिने खास डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी पोस्ट शेअर केलेली आहे.
“त्या व्यक्तीने गोळी लागलेली असतानाही उठून…” कंगना रणौतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी लिहिली खास पोस्ट
शेअर केलेल्या पोस्टमध्ये कंगना रणौतने लिहिले की, “जर मी अमेरिकन नागरिक असते, तर मी या व्यक्तीलाच माझं मत दिलं असतं, ज्याला गोळी लागली होती. त्या व्यक्तीने गोळी लागलेली असतानाही उठून स्वतःचं भाषण पूर्ण केलं होतं. टोटल किलर” अशी पोस्ट लिहित कंगनाने डोनाल्ड ट्रम्प यांना समर्थन केले आहे. कंगनासोबतच अनेक सेलिब्रिटींनी डोनाल्ड ट्रम्प यांना सपोर्ट केला आहे. त्यांना, प्रसिद्ध गायक जेसन एल्डियन, टिव्ही सेलिब्रिटी एम्बर रोज आणि बॉलिवूड सेलिब्रिटींचा आणि स्टारकिड्सचा फेवरेट असलेल्या ओरीने सुद्धा ट्रम्प यांना सपोर्ट केला आहे.
हे देखील वाचा – व्वा! शरद केळकरने केला न्यूलुक, नव्या हेअर स्टाईलमध्ये दिसली एमएस धोनीची झलक!
तर, अमेरिकन सिंगर लेडी गागा, हॉलिवूड स्टार जेनिफर लोपेज, हॉलिवूड सिंगर बियॉन्से आणि टेलर स्विफ्ट यांनी कमला हॅरिस यांना अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत सपोर्ट केला आहे.