
फोटो सौजन्य - Social Media
या भागात वेगेवेगळ्या समुदायाची लोकं राहतात. येथे अफगाणी आणि बलोच, सहज सापडून येतात. येथे सत्तरच्या दशकात अंडरवर्ड वाढ घेऊ लागला. शहरातील पहिला गँगस्टर काला नाग मारला गेला आणि त्याच्या साथीदारांमध्ये शेरू आणि डाडलमध्ये, पुढचा वारस कोण? यावर संघर्ष सुरु झाला. या संघर्षाला संपवणारा स्वतः काला नागचा मुलगा काला नाग २ होता. त्याने त्या दोघांच्या खुनासाठी इकबाल बाबुला सुपारी दिली. त्याने काम तर पूर्ण केले पण त्यांना लालूचे आवाहन स्वीकारावे लागले. लालू आणि बाबू एकमेकांना मारण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत होते. बाबूने तर बजोलाची मदत घेतली आणि लालू तर डाडलच्या मुलालाच प्रशिक्षण देऊन बाबुला मारण्यासाठी तयार करू लागला. आपल्या पित्याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी डाडलचा मुलगा रेहमान डकैत तयार झाला आणि त्याने बाबुला तर संपवलेच आणि ल्यारीच्या गुन्हेगारी क्षेत्रात एक वेगळेच वळण आणले.
वळण असे की ज्या लालूने रेहमानला प्रशिक्षण दिले आणि तयार केले त्याचाच मुलगा अर्शद पप्पू रेहमानचा सगळ्यात मोठा शत्रू बनला आणि त्या दोघांच्या शत्रुत्वामुळे ल्यारीत दररोज खुनाचा वर्षाव होऊ लागला. लोकं घराबाहेर पडायलाही घाबरू लागली आणि शासनाने या क्षेत्राला ‘No Go Zone’ म्हणून घोषित केले. शेवटी पाकिस्तानच्या सरकारने स्वतःच २०१४ साली ‘ल्यारी ऑपरेशन’ला सुरुवात केली. या ऑपरेशनमध्ये पाकिस्तानचे प्रसिद्ध पोलीस अधिकारी आणि तेथील SSP चौधरी अस्लम यांनी एकाएका दहशतवाद्याला पकडून-पकडून मारले आणि स्वतः एका तालिबानी हल्ल्यात मारले गेले.
आज ल्यारीचे रस्ते शांत जरी असले तरी तिथे गरिबी, साक्षरतेचा अभाव आणि सुविधा नसल्याने होणार त्रास एक मोठा प्रश्न आहे.