
नताशा स्टॅनकोव्हिक खरोखर एल्विश यादवला डेट करतेय ? 'त्या' व्हिडिओमागील सत्य आलं समोर
भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याचा काल (११ ऑक्टोबर) वाढदिवस होता. सध्या भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये होणाऱ्या T-20 मालिकेमध्ये कमालीची कामगिरी करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोव्हिकचा घटस्फोट झाला. त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. अशातच अभिनेत्री नताशा स्टॅनकोव्हिकने हार्दिक पांड्याच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रसिद्ध युट्यूबर आणि ‘बिग बॉस ओटीटी २’चा विनर एल्विश यादवसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
तो व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांमध्ये एल्विश आणि नताशाच्या रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा होत आहेत. पण नेमका त्या व्हिडिओमागील सत्य उघडकीस आले आहे. नताशा आणि एल्विश एकमेकांना डेट करत आहेत का? याचं उत्तर चाहत्यांना मिळालं आहे.
हे देखील वाचा – कार्तिक आर्यन-माधुरी दीक्षितलाही माहित नाही चित्रपटाचा शेवट, काय असेल क्लायमॅक्स?
हार्दिक पांड्याच्या वाढदिवशी म्हणजेच ११ ऑक्टोबर रोजी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या नताशा स्टॅनकोविक आणि एल्विश यादव यांच्या व्हिडिओने नेटकऱ्यांमध्ये खळबळ उडवून दिली होती. व्हिडिओमध्ये, नताशा आणि एल्विश दोघेही एकत्र दिसत आहे. ह्या व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये ‘तेरे करके’ हे गाणं वाजत आहे. फ्लोरल प्रिंटेड वेस्टर्न आऊटफिटमध्ये नताशा खूपच सुंदर दिसत आहे. तर एल्विशनेही तिला मॅचिंग सिल्वर जॅकेट ब्लॅक टी- शर्ट आणि जीन्स कॅरी केलेले होते. त्यांचा हा रोमँटिक व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांमध्ये त्यांच्या रिलेशनची जोरदार चर्चा झाली होती. पण नेटकऱ्यांमधली ही चर्चा सपशेल चुकीची ठरली.
नताशाने तिच्या इन्स्टाग्रामवर एल्विशसोबतची व्हिडिओ शेअर केल्यानंतर तिला नेटकऱ्यांनी तुफान ट्रोल केलं आहे. तिच्यावर ट्रोलिंग होत असताना त्यांच्यात रिलेशन नसून ते दोघंही एका शुटसाठी एकत्र असल्याची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, एल्विश आणि नताशा एकत्र दिसणे हा त्यांच्या पुढील प्रोजेक्टचा किंवा शूटिंगचा भाग असू शकतो. ते दोघे एकत्र एका अल्बमचे शूटिंग करत असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, लवकरच त्यांचा व्हिडिओ अल्बम रिलीज होणार असून, हे दोघेही केवळ त्यांच्या अल्बम साँगचंच प्रमोशन करत असल्याची माहिती मिळत आहे.