(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, मात्र यावेळी गाण्यांमुळे नव्हे, तर फिल्म ‘सरदार जी ३’ मधील त्याच्या भूमिकेमुळे. या चित्रपटात दिलजीतने पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरसोबत काम केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. अनेकांनी त्याला “देशद्रोही” ठरवत त्याची नागरिकता रद्द करण्याची मागणी केली होती.२२ एप्रिलला जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील बैसारन व्हॅलीमध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला. . यानंतर भारतात पाकिस्तानी कलाकार, सोशल मीडिया अकाउंट्स, वाहिन्या यांवर बंदी घालण्यात आली. या साऱ्या पार्श्वभूमीवर, दिलजीत दोसांझने ‘सरदार जी ३’मध्ये हानिया आमिरसोबत काम केल्याने त्याच्यावर सोशल मीडियावर प्रचंड टीका झाली. त्याला देशद्रोही म्हटले गेले, तर काही लोकांनी त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिलजीतने प्रथमच या वादावर खुलं वक्तव्य केलं. त्याने सांगितले की, “हा चित्रपट मी पहलगाममधील हल्ल्याआधी शूट केला होता.” त्याने प्रश्न उपस्थित केला की, “भारत आणि पाकिस्तान सामन्यात खेळू शकतात, मग कलाकारांवरच बंदी का?” असा प्रश्न दिलजीतने उपस्थित केला आहे.दिलजीतच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा चर्चा रंगली आहे.
अभिजीतच्या “प्रेमरंग सनेडो” ने जिंकली प्रेक्षकांची मने! तरुणाईला भावलं मराठमोळं ठसका असलेले गाणे
“Oh Mere Desh Da Jhanda Hai,” said Diljit Dosanjh. Amid the past Sardaar Ji 3 India-Pakistan controversy, Dosanjh broke his silence in Kuala Lumpur while commencing the first show of his Aura Tour. Addressing the audience, he spoke of love for India, respect for the national… pic.twitter.com/47ROMxIFOq — Gagandeep Singh (@Gagan4344) September 24, 2025
स्वतः शेतकरी असलेल्या प्रवीण तरडेंचं शेतकऱ्यांवरचं प्रेम पुन्हा एकदा दिसलं! शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार…
पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ सध्या मलेशियामध्ये आपल्या ‘ओरा’ टूरसाठी गेलेला असून, तिथून त्याने देशभक्तीचा स्पष्ट संदेश दिला आहे. अलीकडेच त्याच्यावर “देशद्रोही” असल्याचे आरोप झाले होते, कारण त्याने ‘सरदार जी ३’ या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरसोबत काम केले होते. यावर आता दिलजीतने खुलासा करत भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी तो म्हणाला, “फेब्रुवारीत ‘सरदार जी ३’ची शूटिंग झाली होती, तेव्हा भारत-पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामने खेळले जात होते. त्यानंतर पहलगाममध्ये एक दुःखद दहशतवादी हल्ला झाला. त्या घटनेमुळे सगळे अस्वस्थ झाले. पण एक फरक आहे, माझा चित्रपट हल्ल्याआधी शूट झाला होता, आणि सामना हल्ल्यानंतर खेळला गेला होता.” दिलजीत पुढे म्हणाला, “त्या वेळीही आणि आजही, आम्ही हीच प्रार्थना करतो की त्या दहशतवाद्यांना कठोर शिक्षा व्हावी. पण कृपया हे लक्षात घ्या, आम्ही देशविरोधी नाही.” असंही दिलजीत म्हणाला आहे.
पंजाबी सुपरस्टार दिलजीत दोसांझ लवकरच देशभक्तीपर चित्रपट ‘बॉर्डर 2’ मध्ये झळकणार आहे. चित्रपटात तो फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंह सेखोंया शूरवीर योद्ध्याचीभूमिका साकारत आहे. ही भूमिका खऱ्या आयुष्यातील परमवीर चक्र विजेत्याची असल्यामुळे ती अधिकच विशेष ठरणार आहे.