फोटो सौजन्य - Social Media
गेल्या महिन्याभरात देशात मनोरंजनाला उधाण आले आहे. सैय्याराने देशात एक वेगळाच क्रेझ तयार केला आहे. तसेच बहुचर्चित सिनेमा ‘सितारे जमीन पर’ही नुकताच प्रदर्शित झाला होता. ‘धडक २’ तसेच ‘सन ऑफ सरदार २’ या चित्रपटांनी सिनेचाहत्यांची उत्सुकता अगदी सातव्या आकाशात नेली आहे. पण चाहत्यांनो! तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ही बातमी तुमच्या खिशाला आणि मनाला दोघांना सुखावणारी आहे. आता ‘सितारे जमीन पर’, ‘धडक २’ आणि ‘सन ऑफ सरदार’ या सिनेमांनी प्रेक्षकांच्या खिशाची भरभरून काळजी घेतली आहे. कशी? ती पहाच.
सितारे जमीन पर
अभिनेता अमीर खान यांचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘सितारे जमीन पर’ यातील भावनिक कथेमुळे चाहत्यांच्या फार पसंतीस आला. अभिनेत्याने नुकतेच ‘जनता का थिएटर’ नावाची एक मोव्हमेन्ट सुरु केली आहे. याच्या अनुषंगाने, ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट केवळ १०० रुपयांमध्ये ते ही घरबसल्या युट्युबवर पाहता येणार आहे. सिनेचाहत्यांना तसेच अमीर खान यांच्या चाहत्यांना अगदी आपल्या खिशाला जास्त त्रास न देता घर बसल्या ‘सितारे जमीन पर’ पाहता येणार आहे.
सन ऑफ सरदार 2
अभिनेता अजय देवगणचा बहुचर्चित सिनेमा ‘सन ऑफ सरदार २’, १ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस तत्पर आहे. या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे ‘सन ऑफ सरदार 2’ चा पहिल्या दिवशी अगदी अर्ध्या किमतीत पाहता येणार आहे. बुक माय शो वर ही ऑफर सुरु असून, प्रेक्षकांना या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. २०० रुपयांपर्यंत ऑफही असण्याची शक्यता आहे.
धडक २
धडकच्या भरघोष यशानंतर धडक २ प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज आहे. हा सिनेमा १ ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाची ऍडव्हान्स बुकिंग सुरु झाली असून पहिल्या दिवशी अगदी अर्ध्या किमतीत सिनेमा पाहता येणार आहे. सिने चाहत्यांनी या ऑफरचा लुफ्ट घेण्यास सुरुवात केली आहे.