फोटो सौजन्य - Instagram
ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्मच्या कथित बेकायदेशीर जाहिरातीप्रकरणी दक्षिण भारतातील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज ३० जुलै रोजी अंमलबजावणी संचालनालया (ईडी) समोर हजर झाले. हैदराबादमधील सायबराबाद पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे दाखल केलेल्या गुन्ह्यात नाव असलेल्या २९ सेलिब्रिटींमध्ये त्यांचा समावेश आहे. तसेच या बातमीमुळे अभिनेता चर्चेत आला आहे. बेटिंग ॲप प्रकरण काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
दिग्गज अभिनेत्याची मुलगी असूनही श्रिया पिळगावकरने केला संघर्ष, Mandala Murders ने बदलले नशीब
हा खटला २०१६ पासून सुरु आहे
एफआयआरमध्ये अनेक अभिनेते आणि प्रभावशाली व्यक्तींवर ऑनलाइन जाहिरातींद्वारे बेटिंग ॲप्सचा प्रचार केल्याचा आरोप आहे. प्रकाश राज हे ‘जंगली रम्मी’ नावाच्या गेमिंग ॲपशी संबंधित असल्याचे वृत्त आहे, ज्याचे त्यांनी २०१६ मध्ये प्रमोशन केले होते. तसेच, २०१७ मध्ये ही जाहिरात चुकीची असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ती जाहिरात सोडून दिल्याचे अभिनेत्याने स्पष्ट केले आहे. तेव्हापासून त्यांनी कोणत्याही गेमिंग ॲपचा प्रचार केलेला नाही असे अभिनेत्याचे म्हणणे आहे.
या प्रकरणाशी अनेक कलाकारांची नावे जोडली
ED आर्थिक व्यवहार आणि सेलिब्रिटींचा समावेश असलेल्या डिजिटल व्यवहारांची चौकशी करत आहे. समन्स बजावलेल्यांमध्ये अभिनेते विजय देवरकोंडा, राणा दग्गुबाती, मंचू लक्ष्मी, निधी अग्रवाल, अनन्या नागल्ला आणि टेलिव्हिजन अँकर श्रीमुखी यांचा समावेश आहे. हे सगळे कलाकार या बेटिंग ॲप प्रकरणात अडकले आहेत. ED या सगळ्या कलाकारांची चौकशी करत आहेत.
विजय देवरकोंडाच्या ‘Kingdom’ ची बंपर कमाई; चित्रपट रिलीजआधीच ॲडव्हान्स बुकिंगमध्ये निर्माते मालामाल
ईडीने इतर सेलिब्रिटींनाही समन्स बजावले
या प्रकरणात अभिनेता राणा दग्गुबाती यांना २३ जुलै रोजी हजर राहण्यास सांगितले होते. त्यांनी व्यस्त वेळापत्रकामुळे अधिक वेळ मागितला आहे. एजन्सीने त्यांना १३ ऑगस्ट रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. मंचू लक्ष्मी यांनाही १३ ऑगस्ट रोजी हजर राहायचे आहे. विजय देवेराकोंडा यांना ६ ऑगस्ट रोजी समन्स बजावण्यात आले आहे. अनेक कायद्यांतर्गत दाखल केलेल्या आरोपांनंतर ही चौकशी सुरू आहे. हे खटले फसव्या क्रियाकलाप आणि ऑनलाइन फसवणुकीशी संबंधित आहेत.