बिगबॉस मराठी सीझन ४ मध्ये सोमवारी ४ वाईल्ड कार्ड स्पर्धकांची एंट्री झाली आहे. या सदस्यांमध्ये अभिनेत्री राखी सावंत, अभिनेत्री मीरा जगन्नाथ, अभिनेता आरोह वेलणकर आणि बिगबॉस मराठी ३ चा विजेता विशाल निकम यांचा समावेश आल्यामुळे मनोरंजनात अजूनच भर पडली आहे. मात्र वाईल्ड कार्ड सदस्य म्हणून आलेल्या स्पर्धकांमध्ये पहिल्याच दिवशी घणाघाती भांडण पहायला मिळणार आहे. विशाल निकम आणि राखी सावंत यांच्यात वादावादी होणार असून सध्या या एपिसोडचा टिझर सोशल मीडियावर वायरल होत आहे.
राखी सावंत हे नावच बिगबॉस मराठीमध्ये खळबळ करायला पुरेसं आहे अशी चर्चा सध्या रंगली आहे. आणि आता राखीनं आपल्या स्वभावाला जागून बिग बॉसच्या घरात धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. तिनं आल्या आल्या पंगा घेतला तो तेजस्विनी लोणारीशी. तर आता राखीची विशाल निकमशी देखील जुंपली आहे.
आज मंगळवारी घरात राखी विरुद्ध विशाल असे भांडणपहायला मिळणार आहे. वादाची सुरुवात अमृता धोंगडे आणि राखी यांच्यापासून झाली. अमृता आणि विशाल बोलत असताना राखीने अमृताला विचारले, ‘तुला झोपायचं नाहीये का ? तुला नृत्य करायचे आहे ? लाईट बंद झाले ना ?’, त्यावर अमृता म्हणाली, ‘झोपते आहे, त्यावर राखी म्हणाली, तर मग झोप …’ आणि इथून वाद सुरु झाला. अमृता म्हणाली,’ मला नाही झोपायचं इतक्यात’. त्यावर राखी तिला म्हणाली,’ माझ्या डोक्यावर का नाचतेस ?’, अमृता म्हणाली, ‘मी इथे बसून नाचते आहे’. राखी म्हणाली, ‘मी रात्री बसते तुझ्या डोक्यावर थांब… इडियट…माझी झोपच गेली. आता सगळे झोपल्यानंतर मी बोलणार… उगीच भांडणं ना?’
विशाल त्यावर म्हणाला,’आता झोपा ना तुम्ही’. राखी त्यावर म्हणाली,’आता नाही झोपणार माझी झोप गेली…बोलणार मी आता, माझी मर्जी’. विशाल म्हणाला, ‘तिला शिकवता आणि तुम्ही काय करताय ? तिला का बोलताय एवढं तोंड वर करून’. त्यावर राखी पलटवार करत म्हणाली, ‘मी तेच करते आहे जे ती करत होती’. विशाल म्हणाला, ‘गप बसायचं..’. राखी म्हणाली, ‘तू गप बस…’, आता हा सगळा संवाद आहे विशाल आणि राखीमधला…खरी मजा तर प्रत्यक्ष भांडण पाहण्यात आहे…सध्या प्रोमो व्हायरल झालाय तो मात्र नक्की पहा.
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमो मध्ये विशाल आणि राखी मध्ये कडाक्याचे भांडणं झाले आहे असे दिसून येते आहे. राखीनं फर्माइश सोडत म्हटलं, ‘बिग बॉस माझी कॉफी पाठवा आता…’, त्यावर विशाल म्हणाला, ‘तुमच्या बोलण्याने disturb होत आहेत सर्व, झोपा…’, मग राखीच ती… म्हणाली,’तू झोप मला सांगू नकोस … ‘,मग मात्र पारा चढलेला विशाल म्हणाला, ‘अरेरावी नका करू इथे …’, राखी म्हणाली, ‘माझी मर्जी … ‘,त्यावर विशालने देखील उत्तर दिले, ‘मर्जी सगळीकडे नाही चालणार …’, बिगबॉस मराठीचा हा प्रोमो पाहून सर्व प्रेक्षक उत्साहित झाले आहेत. तेव्हा आजच्या दिवसभरात काय घडत हे पाहणं औसुक्याच ठरणार आहे.