मुंबई: भारतीय चित्रपट सृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठित फिल्मफेअर पुरस्कार सोहळा (Filmfare Awards 2023) काल (27 एप्रिल) मुंबईत पार पडला आहे. अत्यंत दिमाखदार आणि भव्यदिव्य अशा या पुरस्कार सोहळ्यात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या स्पर्धेत ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi)
चित्रपटानं बाजी मारली असुन पुरस्कार पटकावला आहे. तर, अभिनेत्री आलिय भट्टने (Alia Bhatt) या चित्रपटातील अभिनयानं सगळ्याचं लक्ष वेधलं असुन, तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला आहे.
[read_also content=”मुंबईत ज्येष्ठ नागरिकांना आजपासून इन्कोव्हॅक लस मिळण्यास सुरुवात, पालिकेच्या 24 वॉर्डांमधील निवडक केंद्रांवर लस होणार उपलब्ध https://www.navarashtra.com/maharashtra/senior-citizens-can-take-incovac-vaccine-from-today-vaccine-will-be-available-at-selected-centers-in-24-wards-of-the-bmc-nrps-392434.html”]
मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये यंदाचा ‘फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला.या पुरस्कार सोहळ्यात ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. तर, ‘बधाई दो’ ते ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमांचाही बोलबाला राहिला. गंगूबाई काठियावाडी’ सिनेमाला तब्बल सहा पुरस्कार मिळाले आहे .
सर्वोत्कृष्ट चित्रपट : गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : संजय लीला भन्साळी (गंगूबाई काठियावाडी) (Sanjay Leela Bhansali)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : आलिया भट
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : संजय लीला भन्साळी
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन : कृती महेश ‘ढोलिडा’ गाणं
सर्वोत्कृष्ट निर्मिती डिझाइन : सुब्रत चक्रवर्ती आणि अमित रॉय
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत : संचित बल्हारा आणि अंकित बल्हारा
सर्वोत्कृष्ट सिनेमैटोग्राफी : सुदीप चॅटर्जी
सर्वोत्कृष्ट अभिनेता : राजकुमार राव (बधाई दो) (Rajkummar Rao – Badhaai Do)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : आलिया भट्ट (गंगूबाई काठियावाडी) (Alia Bhatt – Gangubai Kathiawadi)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : अनिल कपूर (जुग जुग जियो) (Anil Kapoor – JugJuggJeeyo)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – शीबा चड्ढा (बधाई दो) (Sheeba Chaddha – Badhaai Do)
सर्वोत्कृष्ट संवाद : प्रकाश कपाडिया आणि उत्कर्षणी वशिष्ठ (गंगूबाई काठियावाडी) (Prakash Kapadia, Utkarshini Vashishtha)
सर्वोत्कृष्ट पटकथा : अक्षय घिल्डियाल, सुमन अधिकारी आणि हर्षवर्धन कुलकर्णी (बधाई दो)
सर्वोत्कृष्ट कथा : अक्षत घिल्डियाल आणि सुमन अधिकारी (बधाई दो)फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार 2023 – प्रेम चोप्रा (Prem Chopra)