
सध्या जगातील सगळ्यात मोठा फॅशन इव्हेंट म्हणजे न्यूयार्कमध्ये सुरू असलेला मेट गाला इव्हेंट (Met Gala 2024). या इव्हेंटमधे जगभरातील सेलेब्रिटी हजेरी लावत आहे. या शोमधे कुणी कसा लूक केला आहे याचीच सगळीकडे चर्चा होत आहे. कुणी फुलांचा गालिचा परिधान करून आलेलं दिसतयं तर कुणी चक्क टॅावेल गुंडाळूनही आल्याचं पाहायला मिळतयं. एकूणचं काहीसे स्टाईलिश आणि काहीसे अतरंगी कपडे घालून कलाकार मंडळी फॅशनच्या या महामेळाव्यात आल्याचं दिसतय. पण असं असताना महाराष्ट्राची सून म्हणजे सगळ्यांची लाडकी अभिनेत्री जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) सध्या चर्चेत आली आहे. जेनेलियाच्या साध्या फॅशन सेन्सनं पुन्हा चाहत्याचं मन जिकंलं आहे.
जेनेलियानं आज नवरा रितेश देशमुख (Riteish Deshmukh) सोबत लातूरमध्ये लोकसभा निवडणुकीत (Lok sabha Election 2024) मतदान केलं. रितेश आणि जेनेलिया यांनी लातूर येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. त्यांचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रितेशने यावेळी पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला होता. तर, जेनेलियाने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. तर हातात हिरव्या बांगड्याही घातल्या होत्या. यावर तिने छोटेसे कानातले घातले होते. तर केस मोकळे सोडले होते. जेनेलियाचा हा साधा लूक पाहून नेटकरीही भारावले आहे. तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्स पाऊस पडत आहे. एक युझर म्हणतोय जेनेलिया साडीमध्ये खूपच सुंदर दिसतेय तर एका युझरने तिच्या साध्या राहणीमानाचं कौतुक केलयं.
#WATCH | Maharashtra: Actor Riteish Deshmukh and his wife Genelia Deshmukh cast votes at a polling booth in Latur. NDA has fielded sitting MP Sudhakar Tukaram Shrangare against INDIA Alliance’s Kalge Shivaji Bandappa.#LokSabhaElections2024 pic.twitter.com/tP7DLeGjoJ — ANI (@ANI) May 7, 2024
जेनेलियाच्या वक्रफ्रंट बाबत बोलायचं झालं मागच्या वर्षी तीचा वेड चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. रितेश देशमुख सोबतची तिची जोडी मोठ्या पडद्यावर पुन्हा पाहताना प्रेक्षकांना आनंद झाला. या चित्रपटाने बॅाक्स 75 कोटीचा व्यवसाय केला होता. चित्रपटातील रितेश आणि जेनेलियाची केमेस्ट्रीनं प्रेक्षकांना वेड लावलं होत. आता जेनेलिया देशमुख लवकरच आमिर खानसोबत ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटात दिसणार आहे.