Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’ नाटकाच्या प्रेमात पडलेल्या मायबाप प्रेक्षकाकडून एक तोळा सोनं बक्षीस, जाणून घ्या ‘तो’ किस्सा

मराठी रंगभूमी ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून, संस्कृती, परंपरा आणि आत्मसन्मानाचे प्रतीक आहे. या परंपरेचा एक मानबिंदू असलेले नाटक ‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’ लवकरच आपल्या २५ व्या प्रयोगासाठी सज्ज होत आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jan 29, 2025 | 05:10 PM
Gosht Sanyukt Manapmanachi : 'गोष्ट संयुक्त मानापमानाची' नाटकाच्या प्रेमात पडलेल्या मायबाप प्रेक्षकाकडून एक तोळा सोनं बक्षीस, जाणून घ्या 'तो' किस्सा

Gosht Sanyukt Manapmanachi : 'गोष्ट संयुक्त मानापमानाची' नाटकाच्या प्रेमात पडलेल्या मायबाप प्रेक्षकाकडून एक तोळा सोनं बक्षीस, जाणून घ्या 'तो' किस्सा

Follow Us
Close
Follow Us:

मराठी रंगभूमी ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून, संस्कृती, परंपरा आणि आत्मसन्मानाचे प्रतीक आहे. या परंपरेचा एक मानबिंदू असलेले नाटक ‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’ लवकरच आपल्या २५ व्या प्रयोगासाठी सज्ज होत आहे.

मराठी संगीत रंगभूमीच्या सुवर्णकाळात ‘संगीत मानापमान’ हे नाटक गंधर्व नाटक मंडळी आणि ललित कलादर्श या दोन प्रतिष्ठित नाट्यसंस्थांमध्ये सादर होत असे. या दोन्ही संस्थांचे मालक– बालगंधर्व आणि संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी एकत्र येऊन एक ऐतिहासिक प्रयोग सादर केला, जो पुढे ‘संयुक्त मानापमान’ या नावाने अजरामर झाला. ही ऐतिहासिक घटना आणि त्यामागील कथा प्रेक्षकांसमोर उलगडणारे ‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’ हे नाटक प्रेक्षकांना एका वेगळ्याच जादुई रंगभूमीच्या प्रवासाला घेऊन जाणार आहे.

“अस्सल सातारी ‘माने बंधूंचा’ एक जबराट पिच्चर येतोय…”; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तील ‘या’अभिनेत्यासाठी किरण मानेंची खास पोस्ट

या नाटकाचे लेखक अभिराम भडकमकर, दिग्दर्शक हृषिकेश जोशी असून निर्मिती श्यामराज पाटील आणि अनंत वसंत पणशीकर यांनी केली आहे. आशिष नेवाळकर, हृषिकेश वांबुरकर, ओंकार प्रभूघाटे, अजिंक्य पोंक्षे, श्यामराज पाटील, अशिनी जोशी, प्रद्युम्न गायकवाड परमेश्वर गुट्टे, ऋत्विज कुलकर्णी ,आशिष वझे, निरंजन जावीर, श्रीराम लोखंडे या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.

‘संगीत मानापमान’ नाटकाच्या पहिल्या प्रयोगाची तिसरी घंटा मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी दिली होती. याच परंपरेनुसार, ‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’ नाटकाच्या तिसऱ्या घंटेसाठी वंदना गुप्ते, सुप्रिया पिळगांवकर, मोहन जोशी, रोहिणी हट्टंगडी, मकरंद देशपांडे, आनंद इंगळे, प्रवीण तरडे, उपेंद्र लिमये आणि अशा अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते. आतापर्यंत ४८ मान्यवरांनी ही परंपरा पुढे नेली असून, २५ व्या प्रयोगासाठी कोण तिसरी घंटा वाजवणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे!

“कलाकाराने आत्मविश्वास वाढवणाऱ्या गोष्टीचा त्याग केला पाहिजे…”; ‘देवा’ चित्रपटानिमित्त शाहिद कपूर असा का म्हणाला ?

तुडुंब गर्दीचा इतिहास!
त्या काळात नाटकांचं तिकिट चार आणेपासून सुरू व्हायचं ते ५ रुपयांपर्यंत असायचं. पण ‘संयुक्त मानापमान’ नाटकासाठी प्रेक्षकांची एवढी क्रेझ होती की १०० रुपये तिकीट लावूनही तो प्रयोग हाऊसफुल्ल झाला. प्रेक्षकांना उभं राहायलादेखील जागा नव्हती, एवढंच नव्हे तर प्रेक्षकागृहाबाहेरही फक्त गाणं ऐकता यावं यासाठी प्रेक्षक तात्कळत उभे राहिले होते. एवढी लोकप्रियता या संयुक्त मानापमान नाटकाने मिळवली होती.

रंगभूमीवरील अमूल्य बक्षीस – तोळाभर सोनं!
ही केवळ एक कलाकृती नव्हे, तर महाराष्ट्राच्या नाट्यसंस्कृतीतील एक सोनेरी पर्वणी आहे. ‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’ नाटक शशिधर जोशी या नाट्यरसिकाला इतकं आवडलं की, त्यांनी कृतज्ञता म्हणून तोळाभर सोनं दिग्दर्शकाला बक्षीस म्हणून दिलं. १९२१ चा काळ आता अनुभवता येणं शक्य नाही.. पण या नाटकामुळे तो काळ अनुभवता आला यासाठी त्यांनी दिलेली ती कौतुकाची थाप होती. हा केवळ कलाकारांचा गौरव नव्हता, तर मराठी रंगभूमीवर सादर होणाऱ्या एका अविस्मरणीय कलाकृतीला मिळालेली उत्कृष्ट दाद होती.

इरफान खानसह काम केलेली ही पाकिस्तानी अभिनेत्री रुग्णालयात दाखल, म्हणाली- ‘दुआ में याद रखना’!

२५ वा प्रयोग – एक ऐतिहासिक क्षण!
‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’चा २५ वा प्रयोग म्हणजे नाटकाच्या यशस्वी प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा. नाटकास मिळणाऱ्या उदंड प्रतिसादामुळे हा प्रयोग एक महोत्सव ठरणार आहे. मराठी नाट्यरसिकांनी हा ऐतिहासिक क्षण अनुभवावा आणि या भव्य प्रयोगाचा साक्षीदार व्हावे, हीच आग्रहाची विनंती!

गोष्ट संयुक्त मानापमानाची नाटकाचा रौप्यमहोत्सवी प्रयोग २ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वा. यशवंत नाट्यमंदिर , माटुंगा येथे नक्की उपस्थित राहा आणि मराठी नाट्यपरंपरेतील या सुवर्णक्षणाचा आनंद घ्या!

Web Title: Gosht sanyukt manapmanachi 10 gram gold from fan who fell in love with play silver jubilee event gosht sanyukta manapamanachi marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2025 | 05:10 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.