बॅकग्राउंड डान्सर ते सुपरहिरो; स्टारकिड असूनही शाहिद कपूरला इंडस्ट्रीत करावा लागला होता संघर्ष...
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरच्या ‘देवा’ चित्रपटाची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. येत्या ३१ जानेवारीला शाहिदचा हा अपकमिंग चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये अभिनेता सध्या व्यग्र आहे. कायमच वेगवेगळ्या भूमिकेमुळे चर्चेत राहणारा शाहिद त्याच्या अपकमिंग चित्रपटामुळे जबरदस्त चर्चेत आहे. अपकमिंग चित्रपटामध्ये शाहिद हटके भूमिका साकारणार आहे. ‘देवा’ चित्रपटामध्ये शाहिद कपूर एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, अभिनेत्याने त्याच्या अपकमिंग चित्रपटामध्ये फिटनेसबरोबरच त्याच्या अनोख्या हेअरस्टाईलने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये लूकमुळे चर्चेत राहणाऱ्या शाहिदने ‘देवा’ चित्रपटामध्येही हटके हेअरस्टाईल करत चाहत्यांचे लक्ष वेधलेय. दरम्यान, ‘देवा’ चित्रपटामध्ये शाहिद कपूरने त्याच्या फिटनेससोबतच हेअरस्टाईलवरही वेगवेगळे प्रयोग करताना दिसला आहे. पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत असलेल्या शाहिद कपूरने चित्रपटात खूप सिंपल लूक केलेला दिसत आहे. सध्या चित्रपटानिमित्त अभिनेत्याने, ‘एएनआय’ला मुलाखत दिली. मुलाखतीत शाहिदने चित्रपटामध्ये साकारायचे असलेल्या पात्रानुसार तो संपूर्ण लूक बदलण्यासाठी कधीच मागेपुढे पाहत नाही. मुलाखतीत त्याने पुन्हा एकदा बदललेल्या लूकवर भाष्य केले.
मुलाखतीत अभिनेत्याने सांगितले की, “कलाकाराने जास्त जवळच्या असलेल्या गोष्टींचा त्याग करायला शिकले पाहिजे. भौतिक सुखावर अवलंबून असणाऱ्या गोष्टीपासून दूर गेल्यामुळे एक अभिनेता म्हणून मला माझ्यात आणखीन गोष्टी विकसित करत्या आल्या. माझ्या अंदाजे, केस कायमच एका प्रभावी व्यक्तिमत्वासाठी महत्वाचे राहिले आहेत. सुरुवातीला माझे केसं मोठे होते, तेव्हा माझा लूकही एका साध्या प्रामाणिक मुलाप्रमाणेच होता. एक अभिनेता म्हणून मला फार जास्त जवळच्या वाटणाऱ्या गोष्टींचा त्याग केला पाहिजे, असं मला वाटतं. मला माझे डोळे, माझे केस फार आवडतात.”
आजोबा माजी मुख्यमंत्री, मावशी खासदार; तरीही वीर पहाडियाने का निवडलं नाही राजकारण? वाचा…
“प्रत्येक कलाकाराने स्वत:चा आत्मविश्वास वाढवणाऱ्या एका गोष्टीचा त्याग केला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला समजते की, तुमचा आत्मविश्वास या छोट्या गोष्टींमधून निर्माण होत नाही; त्यामुळेच मला वाटतं ‘हायडर’ चित्रपट माझ्या जीवनाला एक वेगळं वळण देणारा चित्रपट होता.” केस बारीक करताना मनात कोणती भीती आली होती का? असा प्रश्न शाहिदला विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना त्याने थेट लहान मुलांच्या टक्कलशी त्याची तुलना केली. तो म्हणाला की, “लहान मुलांचे टक्कल केले जाते तेव्हा कोणीच विचार करत नाही, केस पुन्हा येतील की नाही. मला वाटतं, केस कापल्याने किंवा टक्कल केल्याने केस आणखी जास्त दाट येतात. त्यामुळे केस कापताना किंवा टक्कल करताना मला कधीच असे काही वाटले नाही.”