बॉलिवूडमध्ये येण्याआधी 'हे' काम करायचा सिद्धार्थ मल्होत्रा! वाचा अभिनेत्याबद्दल...
बॉलिवुडचा हँडसम हंक अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा आज वाढदिवस आहे. सिद्धार्थ मल्होत्राचा जन्म १६ जानेवारी १९८५ रोजी दिल्लीत झाला होता. आपल्या बहारदार अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सिद्धार्थने इंडस्ट्रीमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. दमदार ॲक्टींग आणि अपार मेहनतीच्या जोरावर त्याने यश संपादन केले आहे.
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याचं आईला लिहिलं भावुक पत्र, पोस्ट चर्चेत
सिद्धार्थने आपले प्राथमिक शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण दिल्लीतून पूर्ण केले आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच सिद्धार्थने मॉडेलिंग इंडस्ट्रीत प्रवेश केला. आपला वैयक्तिक खर्च भागवण्यासाठी सिद्धार्थने मॉडेलिंग क्षेत्र निवडलं. केवळ काही वेळेसाठी मॉडेलिंगचा विचार करत असलेल्या सिद्धार्थने हळूहळू फिल्म इंडस्ट्रीत आपले नाव कमावले. यानंतर सिद्धार्थने अभिनयात नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. सिद्धार्थ मल्होत्राने बॉलिवूडमध्ये अनेक हिट भूमिका साकारल्या आहेत. अभिनयानेच तो करिअरच्या यशस्वी शिखरावर आहे.
चित्रपटात अभिनय करण्यापूर्वी सिद्धार्थ मल्होत्राने ट्रेनी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम पाहिले होते. करिअरच्या सुरुवातीला सिद्धार्थने अनुभव सिन्हाच्या चित्रपटासाठी ऑडिशन दिली होती, परंतु हा चित्रपट काही कारणास्तव पूर्ण होऊ शकला नाही. 2008 साली आलेल्या ‘फॅशन’ चित्रपटात मधुर भंडारकर यांनी सिद्धार्थला प्रियंकाच्या अपोझिट मुख्य भूमिकेची ऑफर दिली होती. परंतु, त्यावेळी मॉडेलिंगमध्ये बिझी असलेल्या सिद्धार्थने या चित्रपटास नकार दिला.
बांग्लादेशात ‘पुष्पा २’ नंतर कंगना रणौतच्या ‘इमर्जन्सी’वरही बंदी, नेमकं कारण काय ?
२०१० साली शाहरूख खानच्या ‘माय नेम इज खान’ चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्राने करण जोहरबरोबर सह दिग्दर्शकचे काम पाहिले होते. त्यावेळी त्याला अभिनयात करिअर करायचे आहे हे सगळ्यांना माहित होते. त्याच दरम्यान धर्मा प्रोडक्शनचा आगामी चित्रपट ‘स्टूडंट ऑफ द इयर’ साठी लोकांनी सिद्धार्थला ऑडिशन देण्यास सांगितले. धर्मा प्रोडक्शन चित्रपटासाठी नव्या चेहऱ्याच्या शोधात असताना सिद्धार्थच्या वाट्याला हा चित्रपट मिळाला. अशा प्रकारे सिद्धार्थला त्याच्या चित्रपट कारकिर्दीत पहिला ब्रेक मिळाला.
‘फायनान्शिअल एक्सप्रेस’नुसार, सिद्धार्थ मल्होत्राची संपत्ती सुमारे $20 दशलक्ष आहे आणि त्याची पत्नी कियारा हिची संपत्ती सुमारे $15 दशलक्ष आहे. एकंदरीत, सिद्धार्थ आणि कियारा यांची एकूण संपत्ती अंदाजे $35 दशलक्ष इतकी आहे. हा आकडा 2024 नुसार दिला आहे. यासोबत कियारा ऑडी A8L चालवते. त्याच्याकडे BMW 530d देखील आहे. दुसरीकडे, सिद्धार्थकडे लँड रोव्हर रेंज रोव्हर वोग आणि मर्सिडीज-बेंझ एमएल-क्लास एसयूव्ही आहे.
Oscar 2025: लॉस एंजेलिसच्या आगीची झळ ऑस्करलाही… Oscar 2025 सोहळा रद्द होणार? मोठी अपडेट समोर!