(फोटो सौजन्य-Social Media)
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाची चांगलीच चर्चा होत आहे. येत्या १७ जानेवारीला हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटात कंगना रणौतने भारताच्या स्वर्गीय माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. शिवाय तिनेच या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे. कंगनाचा हा चित्रपट २०२४ मध्येच रिलीज होणार होता. पण, तो वेगवेगळ्या कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. अखेर काही सीन्स कट केल्यानंतर चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने हिरवा कंदील दिला होता. अशातच, आता पुन्हा हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
Oscar 2025: लॉस एंजेलिसच्या आगीची झळ ऑस्करलाही… Oscar 2025 सोहळा रद्द होणार? मोठी अपडेट समोर!
‘इमर्जन्सी’ चित्रपट बांगलादेशमध्ये प्रदर्शित होणार नाही. चित्रपटावर बांग्लादेशात बंदी घालण्यात आली असून यामागील प्रमुख कारण म्हणजे, भारत आणि बांगलादेश यांच्यातील सध्याचे तणावपूर्ण राजकीय संबंध आहेत. शिवाय, दोन्हीही देशांमध्ये राजकीय संबंधही तणावपूर्ण आहेत. बांगलादेशला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यात इंदिरा गांधींनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, ज्यामुळे १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध झाले. १९७१ च्या बांगलादेश स्वातंत्र्ययुद्धात भारतीय लष्कर आणि इंदिरा गांधी सरकारची भूमिका आणि बांगलादेशचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे शेख मुजीबुर रहमान यांना मिळालेल्या पाठिंब्याचे चित्रण यात आहे. त्यांनी इंदिरा गांधींना देवी दुर्गा म्हटलं होतं.
सोबतच चित्रपटामध्ये बांग्लादेशातील अतिरेक्यांनी शेख मुजीबुर रहमान यांची हत्या केल्याचेही दाखविण्यात आले आहे, ज्यामुळे बांगलादेशात या चित्रपटावर बंदी घालण्यात आली, असल्याचं म्हटलं जात आहे. ‘इमर्जन्सी’ चित्रपटालाच बांगलादेशात बंदी घातलेली नाही. यापूर्वीही अनेक भारतीय चित्रपटांना बांग्लादेशात बंदी घातलेली आहे. यामध्ये ‘पुष्पा २’ आणि ‘भूल भुलैया ३’ सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. कंगना रणौतच्या चित्रपटाबाबत यापूर्वीही बराच वाद निर्माण झाला होता. हा चित्रपट 2024मध्ये रुपेरी पडद्यावर रिलीज होणार होता. ‘इमर्जन्सी’ चित्रपटातील काही दृश्यांवर काँग्रेसनेही आक्षेप घेतला होता. ‘इमर्जन्सी’ चित्रपटामध्ये कंगना रणौत इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत आहे. याशिवाय तिने या चित्रपटाचे दिग्दर्शनही केलेय. चित्रपटात अनुपम खेर, श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण, महिमा चौधरी, पुपुल जयकर आणि दिवंगत सतीश कौशिक या कलाकारांच्याही प्रमुख भूमिका आहेत.