Hau de Dhingana Show Fashion Designer Sayali Pangare Interview Special Styling of Siddharth Jadhav
प्रिती माने : उराशी स्वप्न तर सगळेच बाळगतात पण हिंमतीने पूर्ण करण्याची जिद्द अगदी काही लोकांमध्ये असते. पुण्यातील मध्यमवर्गीय कुटुंबातून सिनेविश्वात आपल्या कामाची ओळख निर्माण करण्याचे स्वप्न बाळगणारी अशीच एक तरुणी सायली पांगारे. सायलीने आज मराठी कलाविश्वामध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. तिच्या वेगळेपणाचे कौतुक आज प्रत्येकाचे तोंडात आहे. तिच्या कामाची वाहवाह घराघरात होत आहे.
सायली पांगारे…एक फॅशन डिझायनर. स्टार प्रवाह चॅनेलवरील निखळ मनोरंजन करणारा एक शो म्हणजे ‘होऊ दे धिंगाणा’. वाहिनीवरील मालिकांमधील कलाकारांचे अतरंगी गेम आणि धमाल याने रंगत आणणारा हा शो टीआरपीच्या शिखरावर आहे. यातील सिद्धार्थ जाधवचे सूत्रसंचालन शोला वेगळ्याच स्तरावर घेऊन गेले आहे. या शोमधील वेशभूषांनी तर सर्वांचे लक्ष वेधले आहे. याच वेशभूषा डिझाईन करतीये सायली पांगारे.
सायली मुळची पुण्याची. फॅशन डिझाईनिंगचे स्वप्न पाहणाऱ्या सायलीने त्याचे पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर आपल्या हटके करिअरला सुरुवात केली. प्रसिद्ध फॅशन डिझानर विक्रम फडणीस यांच्याकडे तिने धडे गिरवण्यास सुरुवात दिली. विक्रम फडणीस यांनी सायलीच्या पंखांना बळ देण्याचे काम केले असे ती आवर्जुन सांगते. त्यांच्यासोबत सायलीला पहिल्यांदा ‘मशीन’ या चित्रपटासाठी काम करण्याची संधी मिळाली. या कामासाठी सायली दोन महिने जॉर्जियाला गेली. तिथे तिला चित्रपटसृष्टीमध्ये वेशभूषाकार कशा पद्धतीने काम करतात याचा अंदाज आला.
शाहरुख खान आणि अबराम खानच्या आवाजाने जिंकले चाहत्यांचे मन, मिळाला जबरदस्त प्रतिसाद!
यानंतर सायलीने तिच्या करिअरमध्ये कधीच मागे वळून पाहिले नाही. तिच्या यशस्वी करिअरची घौडदौड मागील दहा वर्षांपासून सुरु आहे. सिद्धार्थ जाधवच्या ‘लग्नकल्लोळ’ या चित्रपटासाठी सायलीने यशस्वी वेशभूषाकार म्हणून काम केले. आणि सिद्धार्थ जाधव व सायली पांगारे यांची रंगसंगती जुळून आली. सायलीने डिझाईन केलेले कपडे सिद्धार्थच्या लूकला ‘चार चॉंद’ लावू लागले. सिद्धार्थाची स्टाईलिंग सिनेविश्वात लक्षवेधी ठरली. सायलीने वेशभूषेत नवनवीन प्रयोग करायचे आणि सिद्धार्थने ते हटके लूक कॅरी करायचे हे जणू समीकरणच बनले. सिद्धार्थने सायलीची ही कल्पविश्वता घेरुन तिला ‘होऊ दे धिंगाणा’ या शोच्या तिसऱ्या पर्वासाठी काम करण्याचे सुचवले.
डिझानर सायली पांगारे हिने अभिनेता सिद्धार्थ जाधवसाठी स्टायलिंग केलेले हटके लूक (फोटो – सोशल मीडिया)
करिअरच्या एक एक पायऱ्या चढणाऱ्या सायलीने वाहिनीच्या सर्व मुलाखती देत ‘होऊ दे धिंगाणा’ सिझन 3 ची वेशभूषाकार म्हणून काम मिळवले. आज या शोची जेवढी चर्चा आहे तेवढी शोमधील कलाकारांच्या डिझानर ड्रेसची देखील चर्चा आहे. प्रत्येक आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भागाचे प्रक्षेपण असते. यामध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांसाठी सायलीला त्याच आठवड्यामध्ये काम करावे लागते. वाहिनीकडून दर आठवड्यासाठी एक थीम सांगितली जाते. त्या थीम प्रमाणे दोन टीममध्ये सामील होणाऱ्या कलाकारांसाठी हटके स्टायलिंग करावी लागते. यामध्ये सूत्रसंचालक असलेल्या सिद्धार्थ जाधवसाठी त्याचे वेगळेपण दाखवून देणारे स्टाईलिंग करावे लागते, असे सायलीने सांगितले आहे.
कलियुगातील ‘रामायण’ आहे वनवास; पाहणाऱ्यांचे डोळे पाणावतील, जनतेचा समोर आला रिव्ह्यू!
एका एपिसोडमध्ये अनेक कलाकार सामील होत असतात. या प्रत्येकासाठी वाहिनीने दिलेल्या थीमप्रमाणे कपडे डिझाईन करावे लागतात. कलाकारांची मोठी संख्या आणि एका आठवड्यापेक्षा कमी अवधी हे डिझानर म्हणून सायलीसाठी नक्कीच आव्हान निर्माण करते. मात्र आपल्या कामाला एक साधना मानणारी सायली यशस्वीरित्या हे शिवधनुष्य पेलते. सिद्धार्थ जाधवला प्रत्येक भागामध्ये वेगळी आणि क्रिएटिव्ह वेशभूषा देण्यासाठी सायलीला कल्पनाशक्तीचा कस लावावा लागतो. पण हेच तिचे वेगळेपण सिद्ध करते.
डिझायन सांगली पांगरे हिने मराठी कलाकारांसाठी केलेली स्टाईलिंग (फोटो – सोशल मीडिया)
सायली पांगारे सॅलियन हिने फॅशन विश्वात आपल्या सर्जनशीलतेने ओळख निर्माण केली आहे. तिच्या घरातून यासाठी तिला खास पाठबळ मिळत असल्याचे देखील तिने नमूद केले आहे. आकाशी उंच झेप घेण्यासाठी सायलीने अनेकदा घर सोडले आहे. मात्र कामासाठी नेहमी सपोर्ट करणाऱ्या तिच्या आई वडिलांनी तिच्या पंखांना बळ दिले. तर सासरकडच्या मंडळींनी देखील तिच्या स्वप्नांसाठी उंच भरारी घेण्यापासून कधीच रोखले नसल्याचे देखील सायलीने सांगितले आहे. मराठी कला विश्वातील प्रेक्षकांच्या प्रेमाने आणि कौतुकाने वेशभूषाकार सायली पांगारे हिला तिच्या कामाची पोचपावती मिळत आहे.