कॅन्सरग्रस्त हिना खानच्या डोळ्यांवर केमोथेरपीचा परिणाम, डोळ्याचा फोटो शेअर करत म्हणाली...
‘ये रिश्ता क्या कहलाता है…’ फेम अभिनेत्री हिना खान गेल्या काही महिन्यांपासून कठीण काळाचा सामना करीत आहे. हिना खानला गेल्या काही दिवसांपूर्वी तिसऱ्या स्टेजवरील ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले आहे. अभिनेत्रीने ऑगस्ट महिन्यात चाहत्यांना सोशल मीडियावरून माहिती दिली. ती नेहमीच सोशल मीडियावर उपचारासंबंधित आणि आपल्या हेल्थबद्दलची माहिती शेअर करत असते. आता अशातच अभिनेत्रीने आपल्या चाहत्यांना हेल्थबद्दलची अपडेट दिली आहे.
हे देखील वाचा – मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचा लॅक्मे फॅशन वीकमध्ये कमाल लुक पाहून चाहते घायाळ!
हिना खानने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यात तिचा एकच डोळा दिसत आहे. फोटोमध्ये तिच्या डोळ्याची पापणी दिसत आहे. फोटो शेअर करत तिने तिच्या ह्या कठीण काळातील प्रेरणास्त्रोत कोण आहे, याबद्दल सांगितले आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये हिना म्हणते, “सध्याच्या काळातील तुम्हाला माझे प्रेरणास्त्रोत कोण आहे, जाणून घ्यायचे का ? ह्या पापण्या माझ्या डोळ्याच्या शक्तिशाली आणि सुंदर ब्रिगेडचा एक भाग आहेत. ते माझ्या डोळ्यांची सुंदरता वाढवत आहेत. माझ्या पापण्या आनुवंशिकतेने लांब आणि सुंदर होत्या. आता ही पापणी माझ्या बाजूने लढत एकटी उभी आहे. माझ्या शेवटच्या केमोथेरपीदरम्यान ही एक पापणी माझा प्रेरणास्रोत आहे.”
यासोबतच हिनाने असा खुलासाही केला की तिने केव्हाही खोट्या पापण्या लावल्या नाहीत. पण तिला आता त्या काही कारणास्तव शुटिंगसाठी वापरावे लागणार आहेत. तिने पोस्टमध्ये पुढे लिहिले की, “मी इंडस्ट्रीमध्ये असल्यापासून खोट्या पापण्या वापरल्या नाहीत, पण आता मी ते माझ्या शूटसाठी वापरत आहे. काही हरकत नाहीये… एक दिवशी सर्व काही ठीक होईल.” नुकताच हिनाने तिचा 37 वा वाढदिवस सेलिब्रेट केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला चाहत्यांनी खूप प्रेम देत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिने सर्व चाहत्यांचे आणि सेलिब्रिटी फ्रेंड्सचे सोशल मीडियाच्या माध्यमातून आभार मानले.
हे देखील वाचा – सेलिब्रिटी वेडिंग प्लॅनर सचित मित्तलने इको-फ्रेंडली लग्नाचे आयोजन केले सुरु!